धुळे (प्रतिनिधी) – अमरिशभाई पटेल यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या धुळे-नंदुरबार विधानपरिषदेेसाठी ३० मार्च रोजी पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने आचारसंहिता लागू केली आहे. गेल्या वर्षी १ ऑक्टोबर रोजी अमरिशभाई पटेल यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपत प्रवेश केला होता. त्यामुळे ही जागा रिक्त होती.उर्वरित कालावधीसाठी आयोगाने पोटनिवडणुकीची घाेषणा केली. आता कोण उमेदवार भाग्य आजमवतात व कोण बाजी मारते याकडे लक्ष आहे.