धुळे ;-धुळे शहरातील कुविख्यात गुन्हेगार नरेश कांतीलाल गवळी (28, यादव, मारोती मंदिरामागे, नगावबारी चौफुली, देवपूर, धुळे) यास स्थानबद्ध करण्यात आल्याची माहिती धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. संशयीत गवळी विरोधात देवपूर, देवपूर पश्चिम व चाळीसगाव रोड पोलिसात गंभीर स्वरूपाचे दहा गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, विनयभंग, दंगा, लूटमार, खंडणी, ब्लॅकमेलिंग करणे आदी गुन्हे त्याच्याविरोधात दाखल असल्याने त्याची परिसरात मोठी दशहत होती.
देवपूर ठाण्याचे प्रभारी निरीक्षक धनंजय पाटील यांनी संशयीताविरोधात स्थानबद्धतेचा प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षकांमार्फत जिल्हाधिकार्यांकडे दाखल केल्यानंतर त्यास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मंजुरी दिली व 5 सप्टेंबर रोजी संशयीताला नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. प्रस्तावाकामी धुळे गुन्हे शाखेने निरीक्षक श्रीराम पवार, हवालदार संतोष हिरे यांनी विशेष मेहनत घेतली.
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, सहा.पोलीस अधीक्षक ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर प्रभारी निरीक्षक धनंजय पाटील, साईनाथ तळेकर, राजेंद्र इंदवे, मिलिंद सोनवणे, भटू बैसाणे, महेंद्र भदाणे, विजय जाधव, राजेंद्र हिवरकर, राहुल गुंजाळ, सौरभ कुटे, भटेंद्र पाटील आदींनी संशयीताला नाशिक कारागृहात स्थानबद्ध केले.