नागपूर – कोंबडीच्या मागे पळताना बहिण भावाचा एकाच वेळी नाल्यात पडुन मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना हिंगणा तालुक्यातील आमगाव-देवळी येथे घडल्यामुळे येथील परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हिंगणा ते कान्होलीबारा रोडवर १० किलोमीटर अंतरावर आमगाव देवळी इथे ही घटना घडली.
आरुषी नामदेव राऊत वय 10 आणि अभिषेक नामदेव राऊत वय 7अशी या चिमुकल्यांची नावे आहेत. त्यांचे आई-वडील दिवसभर मोलमजुरी करून घरी परतल्यानंतर संध्याकाळी मुले घरी दिसली नसल्याने चिंताग्रस्त झालेल्या आई व डिलांनी शोधाशोध करण्यास सुरुवात केली. हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आमगाव – देवळी हे गाव असून शोधाशोध करूनही मुलीने न सापडल्याने नामदेव राऊत यांनी दोन्ही मुलं बेपत्ता झाली असल्याची हिंगणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
नामदेव राऊत यांनी गावातील स्थानिक ग्रामस्थांना सोबतीला घेऊन गाव आणि शेतीवाडीवर मुलांना शोधले. तेव्हा दोन्ही भावंडांच्या चप्पल आणि कपडे नाल्याच्या शेजारी आढळून आली. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पट्टीच्या पोहोणारेच्या मदतीने मुलांना शोधण्यात आले.
अभिषेक आणि आरुषी कोंबडीच्या मागे पळत असताना त्याचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास हिंगणा पोलीस करत आहेत.