जळगाव शहरातील प्रेम नगर भागात रेल्वे रुळांवर घडली घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- शहरातील बजरंग रेल्वे बोगदा आणि राष्ट्रीय महामार्ग उड्डाणपूलादरम्यान असलेल्या रेल्वे रूळावर धावत्या रेल्वेच्या धडकेत ५ गायी जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दिनांक २ नोव्हेंबर रोजी ६ सहा वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेतली होती.
जळगाव शहरातील बजरंग रेल्वे बोगदा ते राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपूलच्या दरम्यान असलेल्या प्रेम नगरातील रायसोनी विद्यालयासमोर रेल्वे रुळावर पवन एक्सप्रेसच्या धावत्या रेल्वे गाडीच्या धडकेत रेल्वेरुळाजवळ चरत असलेल्या ४ गायी जागीच ठार तर १ गंभीर जखमी झाली आहे. ही घटना शनिवारी २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलीस कर्मचारी आणि स्थानिक पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या संदर्भात पोलीस स्टेशनला घडण्याची नोंद घेण्याचे काम सुरू होते.