धरणगाव तालुक्यातील कवठळ येथील घटना
धरणगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील कवठळ येथील शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी दिनांक २५ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता उघडकीला आले आहे. धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.
शरद खंडू पवार (वय ५७ रा. कवठळ ता.धरणगाव) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. गावात शरद पवार हे पत्नी, दोन मुलं व सुना यांच्यासोबत वास्तव्याला होते. शेती करून ते उदरनिर्वाह करत होते. (केसीएन)त्यांनी यावर्षी त्यांच्या शेतीसह इतरांची शेती कसण्यासाठी घेतलेली होती. शेतीसाठी त्यांनी कर्ज काढले होते. दरम्यान या कर्जबाजारीमुळे ते काही दिवसांपासून विवंचनेत होते. दरम्यान गुरुवारी २५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता त्यांनी चहापाणी करून घरातून शेतात जाण्यासाठी निघून गेले.
त्यानंतर त्यांचा मुलगा मयूर पवार हा सकाळी १०.३० वाजता शेतात गेला, त्यावेळी वडिलांनी झाडाला गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी शेतातील मजुरांना बोलवून खाली उतरत तातडीने जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहल दुग्गड यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. धरणगाव पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते.