धुळे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; सहा लाख 84 हजाराची रोकड जप्त
धुळे (वृत्तसंस्था ) ;- धरणगावातील व्यापार्याच्या दुचाकीला लाथ मारून डिक्कीतील सुमारे 11 लाख रुपये लूटण्यात आल्याची घटना शहराजवळील फागणेजवळ घडली होती. . याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर धुळे गुन्हे शाखेने पाच आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून सहा लाख 84 हजाराची रोकड जप्त करण्यात आली.
धुळे तालुक्यातील फागणे गावाजवळ नागपूर-सुरत महामार्गावर 18 जुलै रोजी मुनीम किशोर पंढरीनाथ पाटील व त्यांचे मित्र अतुल लक्ष्मीनारायण काबरा हे धुळ्यातील श्री रत्न ट्रेडींगमध्ये सोयाबीन विक्रीसाठी आले होते व सोबत सोयाबीन विक्रीची रक्कम 10 लाख 91 हजार रुपये दुचाकीच्या डिक्कीत ठेवून ते दुचाकी (एम.एच.19 बीई 1807) ने निघाले असता फागणे गावाबाहेर आल्यानंतर ते अमळनेर रस्त्याकडे वळल्यानंतर दोन तरुण दुचाकीवरून आल्यानंतर एकाने तू माझ्या बहिणीचे नाव का घेतले, असे कारण सांगून धमकावण्यास सुरुवात केली तर दुसर्या तरुणाने व्यापार्यांच्या दुचाकीला लाथ मारून त्यांना खाली पाडले. यानंतर दुचाकीच्या डिक्कीमधील रोकड घेऊन संबंधित तरुण पळून गेले. या घटनेत खाली पडल्यामुळे व्यापार्याच्या डोळ्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली या संदर्भात त्याने तातडीने धुळे तालुका पोलीस ठाण्यात संपर्क करून गुन्हा दाखल केला.
धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांनी जे.बी.रोड ते घटनास्थळापर्यंतचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासले असता पांढर्या रंगाची अॅसेस मोपेड मोटारसायकलवर दोन तरुण जातांना दिसल्यानंतर त्यांनी धुळ्यातील श्री रत्न ट्रेडींग येथील कामास असलेला तरुण यश विश्वनाथ ब्रम्हे (22, रा. पवननगर, चाळीसगावरोड, धुळे) याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पाच जणांना अटक
आरोपी यश विश्वनाथ ब्रम्हे (22, रा.पवननगर, चाळीसगावरोड, धुळे), चंद्रकांत रवींद्र मरसाळे (21, रा.मनोहर टॉकीजच्या मागे, धुळे), कल्पेश शाम वाघ (रा. पवन नगर हुडको, चाळीसगावरोड), राहुल शाम वाघ (26, रा.पवन नगर, हुडको), सनी संजय वाडेकर (28, रा.मनोहर टॉकीजच्या मागे, धुळे) या पाच आरोपींना अटक केली तर संशयीत राहुल अनिल नवगिरे (पवननगर, चाळीसगावरोड, धुळे) हा पसार झाला आहे. आरोपी यशने व्यापारी श्री रत्न ट्रेडींगमधून सोयाबीन विक्रीची रक्कम घेवून धरणगावकडे जाण्यास निघाल्यानंतर संशयीत राहुल नवगिरे यास त्याच्या मोबाईलवर ‘एक घोडा दो दुल्हे निकल गये’ असे कोडवर्डच्या माध्यमातून सांगितल्यानंतर पाच संशयीत वेगवेगळया दुचाकींवर ठिकठिकाणी थांबून तक्रारदाराचा पाठलाग करीत असल्याचे समोर आले आहे.
यांनी केली कारवाई
हा गुन्हे धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, धुळे तालुक्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, गुन्हे शाखेचे एपीआय श्रीकृष्ण पारधी, संजय पाटील, पंकज खैरमोडे, शशिकांत देवरे, रवीकिरण राठोड, सुशील शेंडे, निलेश पोतदार, गुणवंत पाटील व धुळे तालुका पोलीस स्टेशनचे किशोर खैरनार, कुणाल पानपाटील, उमेश पवार, विशाल पाटील आदींच्या पथकाने केली.