रोकडसह दुचाकी जप्त, चाळीसगाव तालुक्यात भवाळी येथे घडली होती घटना
जळगाव (प्रतिनिधी) : चाळीसगाव हद्दीतील भवाळी गावात वृद्ध शेतकरी दांपत्याला धारदार चाकूचा धाक दाखवत १९ बोकड व ७ बकऱ्या एका गँगने चोरून नेल्या होत्या. एलसीबीच्या पथकाने शिताफीने शोध घेत एक गँग पकडली आहे. मुद्देमाल परत मिळताच दांपत्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले.
चाळीसगाव तालुक्यातील भवाळी गावात एक शेतकरी दांपत्याने शेडमध्ये १९ बोकड व ७ बकऱ्या बांधून ठेवल्या होत्या. सप्टेंबर महिन्यात रात्रीच्या सुमारास काही तरुण त्याठिकाणी आले. पाणी मागण्याच्या बहाण्याने प्रवेश करीत त्यांनी दांपत्याच्या गळ्याला सुरा लावला. जीवे मारण्याची धमकी देत दरोडेखोरांनी चारचाकी वाहनात सर्व पशूधन घेत पोबारा केला.(केसीएन) चोरट्यांच्या शोधार्थ एलसीबीचे पथकातील अधिकारी व अमंलदार यांना तांत्रिक व गुप्त बातमीदारामार्फत गोपनीय माहिती मिळाली. चाळीसगांव ग्रामीण पो.स्टे.ला दाखल गुन्हा चेतन गायकवाड याने त्याचे साथीदारासह केला असल्याची बातमी मिळाली. त्यामुळे पथक दोन दिवसापासून भवाळी ता.चाळीसगाव भागात पाळत ठेवून होते.
दि.३ ऑक्टोबर रोजी खात्रीशीर बातमी मिळाली की, चेतन गायकवाड व त्याचे साथीदार गावात आले आहेत. पथकाने सापळा रचून चेतन गायकवाड व त्याचे साथीदार यांना ताब्यात घेतले. चौकशीत चेतन गायकवाड याने सांगितले की, त्याने व त्याच्यासोबत असलेले गोरख फकीरा गायकवाड, बबलु आबा जाधव, गोरख सुरेश गोकुळ, सोमनाथ भिकन गायकवाड, गोकुळ गायकवाड व शंकर मोरे सर्व रा भवाळी ता चाळीसगांव अशांनी मजुरी व्यवसाय निमीत्त ते हिंगोणे परीसरात जात होते. (केसीएन)तेव्हा तेथे त्यांनी एका शेतामध्ये पत्र्याच्या शेड मध्ये बकऱ्या असल्याची माहीती होती. म्हणुन त्या सर्वांनी मिळुन चारचाकी वाहनाने व मोटार सायकलने सदर ठिकाणी जावून तेथे खाटीवर झोपलेल्या इसमास धारदार शस्त्राचा धाक दाखवून शेड मधील १९ बोकड व ७ बकऱ्या त्यांनी सोबत आणलेल्या चारचाकी वाहनाने व मोटार सायकलने घेवुन जावुन विक्री केल्या.
बकऱ्या आणि बोकड विक्रीतुन आलेली रक्कम सर्वांनी वाटणी केली. पोलिसांनी ५ संशयित आरोपी यांना ताब्यात घेवून त्यांचेकडून १ लाख ९ हजार रोख व २६ हजाराची गुन्ह्यात वापरलेली मोटार सायकल असा मुद्देमाल जप्त केला आहे. इतर आरोपी गोकुळ गायकवाड व शंकर मोरे यांना चाहुल लागल्याने ते पळुन गेले असून पुढील तपास चाळीसगाव पोलीस करीत आहेत.(केसीएन)सर्व पशुधन शेतकऱ्याने परत घेतले असून त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तराळले आहेत. कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोउपनिरी गणेश वाघमारे, दत्तात्रय पोटे, हवालदार संदिप पाटील, हरीलाल पाटील, मुरलीधर धनगर, प्रविण भालेराव, महेश पाटील, सागर पाटील, ईश्वर पाटील, दिपक चौधरी यांच्या पथकाने केली आहे.