जळगावातील पिंप्राळा हुडको येथील घटना
जळगाव (प्रतिनिधी) – पिंप्राळा हुडको परिसरातील एका तरूणाला शिवीगाळ, मारहाण करून धारदार वस्तूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रविवारी २५ जून रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुबेरखान उस्मानखान (वय-३५) रा. पिंप्राळा हुडको, जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह राहतो. रविवारी २५ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास काहीही कारण नसतांना त्याच परिसरात राहणरे शेख मुसा शेख पिरन, शेख समिर शेख मुसा, शेख अस्लम शेख पिरण आणि शेख इब्राहिम शेख पिरण या चौघांनी जुबेर खान याला शिवीगाळ, मारहाण करत धारदार वस्तूने बेदम मारहाण केली.
यात जुबेर खान हा जखमी झाला. रविवारी २५ जून रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी शेख मुसा शेख पिरन, शेख समिर शेख मुसा, शेख अस्लम शेख पिरण आणि शेख इब्राहिम शेख पिरण या चौघांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक हर्षल पाटील करीत आहे.