• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धरणगावात कृत्रिम दूध प्रकरणी पुन्हा कारवाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 28, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
धरणगावात कृत्रिम दूध प्रकरणी पुन्हा कारवाई

रसायने आणि पामोलीन तेल वापरून भेसळयुक्त दूध विक्री; संशयिताविरुद्ध गुन्हा

जळगाव (प्रतिनिधी):- धरणगाव तालुक्यात भेसळयुक्त कृत्रिम दूध तयार करून विक्री केल्याप्रकरणी पुन्हा एकदा मोठी कारवाई करण्यात आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या भेसळ माफियांविरोधात प्रशासनाने कठोर पवित्रा घेत अन्न सुरक्षा मानके अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

सोमनाथ आनंद माळी (वय ३२, रा. भवरखेडा, ता. धरणगाव) असे संशयिताचे नाव असून तो रिफाइंड पामोलीन तेलासह विविध रसायनांचा वापर करून कृत्रिम दूध तयार करत असल्याचा आरोप आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, हे भेसळयुक्त दूध चांगल्या दुधात मिसळून त्यातील फॅटचे प्रमाण कृत्रिमरीत्या वाढवले जात होते. त्यानंतर आर्थिक फायद्यासाठी त्याची विक्री केली जात असल्याचे उघड झाले आहे.

या प्रकारामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला असून जनतेच्या जीवाशी थेट खेळ होत असल्याचे समोर आले आहे. अन्न सुरक्षा अधिकारी आकाश कैलास बोराडे यांच्या तक्रारीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात संशयिताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्षभरापूर्वीही झाली होती कारवाई

विशेष म्हणजे, जुलै २०२५ मध्येही अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत भवरखेडा येथे संशयिताच्या घरावर छापा टाकला होता. त्यावेळी कृत्रिम दूध तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी घातक रसायने, साहित्य आणि उपकरणे जप्त करण्यात आली होती. प्राथमिक चौकशीत संशयिताने कृत्रिम दूध तयार करून विक्री करत असल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली होती.

त्या प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी किशोर साळुंखे यांच्या तक्रारीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही संशयिताने हा अवैध व्यवसाय पुन्हा सुरू ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

गुप्त माहितीच्या आधारे संयुक्त छापा

अन्न सुरक्षा विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने संशयिताच्या घरावर पुन्हा छापा टाकला. या कारवाईत भेसळयुक्त दूध तयार करण्यासाठी वापरली जाणारी रसायने, पामोलीन तेल तसेच विविध उपकरणे आढळून आली. संबंधित साहित्य जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

दुधासारख्या अत्यावश्यक अन्नपदार्थात भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास धरणगाव पोलीस करत आहेत.


 

 

Tags: dharangaon-krutim-dudh-karvai
Previous Post

वीज वितरण कंपनीच्या ठेकेदारांची लाखोंची विद्युत तार चोरी

Next Post

कानातून पाणी, डोकेदुखीने आणली शस्त्रक्रियेची वेळ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
कानातून पाणी, डोकेदुखीने आणली शस्त्रक्रियेची वेळ

कानातून पाणी, डोकेदुखीने आणली शस्त्रक्रियेची वेळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

देवगिरी बँकचे ५.३३ कोटी घोटाळा प्रकरण: संशयित प्रवीण वाघ यांना अटक
1xbet russia

देवगिरी बँकचे ५.३३ कोटी घोटाळा प्रकरण: संशयित प्रवीण वाघ यांना अटक

May 28, 2026
जिल्हा कारागृहात थरार! बंदिस्त बराकीतच कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला भिंतीवर आदळल्याने गंभीर दुखापत!
1xbet russia

जिल्हा कारागृहात थरार! बंदिस्त बराकीतच कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला भिंतीवर आदळल्याने गंभीर दुखापत!

May 28, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
1xbet russia

महादेव हॉस्पिटल येथे अत्याधुनिक न्यूरोलॉजी अतिदक्षता विभागाची सुविधा

May 28, 2026
कानातून पाणी, डोकेदुखीने आणली शस्त्रक्रियेची वेळ
1xbet russia

कानातून पाणी, डोकेदुखीने आणली शस्त्रक्रियेची वेळ

May 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

देवगिरी बँकचे ५.३३ कोटी घोटाळा प्रकरण: संशयित प्रवीण वाघ यांना अटक

देवगिरी बँकचे ५.३३ कोटी घोटाळा प्रकरण: संशयित प्रवीण वाघ यांना अटक

May 28, 2026
जिल्हा कारागृहात थरार! बंदिस्त बराकीतच कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला भिंतीवर आदळल्याने गंभीर दुखापत!

जिल्हा कारागृहात थरार! बंदिस्त बराकीतच कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला भिंतीवर आदळल्याने गंभीर दुखापत!

May 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon