चोपडा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील धानोरा येथे आज दुपारी धानोरासह परिसरातील शेतकऱ्यांनी कोरोना नियम पाळत विविध मागण्यांसाठी अंकलेश्वर-बऱ्हामपुर महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले
शेतकरी विविध संकटांनी मेटाकुटीला आला आहे. विज वितरण कंपनीकडून मात्र कनेक्शन तोडण्याचा सपाटा सुरू आहे. ही विज तोडणी तात्काळ थांबवावी, कांद्याचे नुकसानीची भरपाई देऊन हमी भाव द्यावा, कापसाचा हमीभाव वाढवून दहा हजार मिळावा, केळीला बोर्डाप्रमाणे भाव मिळावा, शेतीसाठी आठ तासांऐवजी किमान १२ तास विजपुरवठा व्हावा.व मिळणाऱ्या विजेप्रमाणेच बिलं आकाराणी करावी अशा विविध मागण्यांसाठी धानोरा येथे अंकलेश्वर-बऱ्हामपुर महामार्गावर जळगाव चौफुलीवर संतोष सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरातील शेतकऱ्यांनी कोरानाचे सर्व नियम पाळून मोजक्या संख्येने एकत्र येत रास्तारोको आंदोलन केले.
यावेळी काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. संतोष सपकाळे यांनी शेतकऱ्यांवर आलेल्या संकटांचा पाढाच वाचला. शेतीच्या आड येणाऱ्या समस्या सोडवून शेतीमालाला योग्य भाव मिळवून द्या. तरच शेतकरी वाचेल याची जाणीव ठेवत शासनाने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवाव्या असे ते म्हणाले . मागण्यांचे निवेदन अडावद पो.स्टे.चे स.पो नि किरण दांडगे यांना देण्यात आले. यावेळी संतोष सपकाळे यांच्यासह भरत कोळी, सी.एस.सपकाळे, जगदीश भोई, विनायक पितांबर पाटील ( बिडगाव), विष्णू बाविस्कर (पुणगाव), नवल ठाकरे , वासुदेव ठाकरे, चंदु साळुंखे , विठ्ठल पाटील, दिलीप बाविस्कर, देविदास साळुंके, रविंद्र पाटील यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. अडावदचे स.पो नि किरण दांडगे, एएसाय सुनील तायडे, पो.का.कदीर शेख, जयदीप राजपूत, योगेश गोसावी यांनी बंदोबस्त ठेवला.