धानोरा (प्रतिनिधी) – चोपडा तालुक्यातील धानोरा येथिल अंगणवाडीत सेविका-मदतनीस यांनी स्वच्छता मोहीम राबवून परीसर स्वच्छ केला.सदर अंगणवाडीला संरक्षक भिंत बांधण्यात आली.दरम्यान ठेकेदाराने आपले काम उरकून घेऊन घाण तेथेच राहु दिली,यामुळे अंगणवाडीतील महीलांना सदर घाण साफ करावी लागली.याकडे ग्रामपंचायत ने दूर्लक्ष केल्याने महीलांना स्वच्छता करावी लागली.
येथिल ग्रामपंचायत कार्यालयाला लागुनच अंगणवाडी केंद्र आहे.गेल्या महीन्यात चौदाव्या वित्त आयोगातुन संरक्षक भिंत बांधण्यात आली.यावेळी बांधकामाचे सर्व साहीत्य याच भागात पडून होते.यामुळे परीसरात घाण साचलेली आहे. अंगणवाडीच्या थेट मागच्या बाजुला पुरुष शौचालय असल्याने प्रचंड घाण नेहमीच असते. सोबत याच अंगणवाडीत रात्री पत्त्याचे अड्डे सुरु असतात.या पत्ते खेळणा-यांनी गुटखा खाऊन भिंती रंगवलेल्या आहेत. तसेच मुख्य रस्त्यावरील काही दुकानदार या परीसरात लघुशंका करतात.या सर्व प्रकारांना येथिल महीलांना सामोरे जावे लागते.या सर्व प्रकाराकडे महीला लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.
ग्रामपंचायत वर प्रशासक
गेल्या महीनाभरापासुन ग्रामपंचायतवर प्रशासक आहे.यामुळे ते आठवड्यात एक दिवस येऊन काम पाहत आहेत.प्रशासक जितेंद्र पाटील,ग्रामसेवक दिपक भामरे यांनी वसुली मोहीमेवर भर दिला असुन एकाच आठवड्यात तब्बल तीन ते चार लाख रुपये वसुल केले.तसेच अवैध नळकनेक्शन शोधमोहीम सुरु केलेली आहे. यामुळे प्रशासक यांनी विकासकामाकडे जसे लक्ष दिले तसेच स्वच्छता मोहीमेवर भर द्यावा,अशी मागणी करण्यात आलेली आहे.
अंगणवाडीत स्वच्छता मोहीम राबवतांना सेविका-मदतनीस.