यावल शहरातील घटना
यावल (प्रतिनिधी) :- यावल शहरामध्ये सार्वजनिक जागी माजी आमदार शिरीष चौधरी यांचे सुपुत्र तथा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राज्य पदाधिकारी धनंजय चौधरी यांना दि. ९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजता अनिस उर्फ पप्पू पटेल (रा. विरार नगर) यांनी कारण नसताना धनंजय चौधरी या ठिकाणी नसताना त्यांना दारूच्या नशेत शिवीगाळ केली.
त्याला पटेल वाड्यात पाय ठेवू देणार नाही. पटेल वाड्यात पाय ठेवल्यास पाय तोडून टाकेल, अशी धमकी दिली. याबाबत यावल पोलीस स्टेशनला अदखलपात्र गुन्हा अनिल निळकंठ जंजाळे यांच्या तक्रारीवरून दाखल झाला आहे. याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे.