क्षयरोग मुक्त अभियान अंतर्गत गौरव
चंद्रकांत कोळी
रावेर (प्रतिनिधी) : क्षयरोग निर्मूलनबाबत रावेर तालुक्यातील धामोडी ग्रामपंचायत सरपंच अर्चना पाटील यांनी विशेष कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातून ८ ग्रामपंचायत पैकी धामोडी तालुका रावेर येथील सरपंच अर्चना दिपक पाटील यांना जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सचिन भायेकर यांच्या हस्ते विशेष गोल्डन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
देशातून क्षयरोग निर्मूलनाच्या मोहिमेला पुनरुज्जीवित करण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू व प्रधानमंत्री क्षयरोग (टीबी) मुक्त भारत अभियानाचा आरंभ दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले.त्या विकासाचे लक्ष्य गाठण्याच्या पाच वर्षे आधीच देशातील क्षयरोग संपुष्टात आणण्याचे स्पष्ट आवाहन मार्च २०१८ मध्ये दिल्ली येथे झालेल्या एंड टीबी समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्या अनुषंगाने रावेर तालुक्यातील धामोडी ग्रामपंचायत सरपंच यांनी विशेष कामगिरी केल्याबद्दल जिल्ह्यातून ८ ग्रामपंचायत पैकी धामोडी तालुका रावेर येथील सरपंच अर्चना दिपक पाटील यांना विशेष गोल्डन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
त्याबद्दल मुक्ताईनगर विधानसभाआ. चंद्रकांत पाटील, रावेर विधानसभा आ. अमोल जावळे, भाजपा लोकसभा प्रमुख नंदू महाजन, भाजपा सरचिटणीस रावेर तालुका दुर्गादास पाटील, युवासेना तालुका उपाध्यक्ष दिपक जैन, यांनी अभिनंदन केले आहे . तसेच धामोडी ग्रामपंचायततर्फे ग्रामपंचायत सदस्य दिनकर नारायण पाटील, श्री निनाराम दशरथ मेंढे, स्वीटी दुर्गादास पाटील, कल्पना गुलाब पाटील, आशाबाई विनोद पाटील, मनिषा जगदीश पाटील, विलास रघुनाथ पाटील,रमेश इंगळे, आरोग्यसेवक सुलभा योगेश पाटील, जया योगेश महाजन, ग्रामस्थ धामोडी यांनी आभार मानले.