जळगांव (प्रतिनिधी) : प्राथमिक आरोग्य केंद्र धामणगाव येथील आरोग्य सेवक निलेश पाटील यांना आज नाशिक येथे उत्कृष्ट कर्मचारी म्हणून पुरस्कार प्रदान करण्यात आला.
जिल्ह्यातील आरोग्य सेवक यांचे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाचे कामाचे मूल्यांकन करण्यात आले होते. यात प्रा. आ. केंद्र धामणगाव ता. जळगांव येथील आरोग्य सेवक निलेश पाटील हे सन २०२३ – २४ साठी उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कारासाठी पात्र ठरल्याने त्यांना आज स्वातंत्र्यदिनी दि. १५ ऑगस्ट रोजी नाशिक येथे डाॅ. कपिल आहेर, उपसंचालक, आरोग्य सेवा, नाशिक मंडळ, नाशिक व डाॅ. विवेक खतगांवकर, सहा.संचालक, आरोग्य सेवा हिवताप नाशिक यांचे हस्ते उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आला. नाशिक विभागातून हा पुरस्कार त्यांना देण्यात आला.
याबाबतीत त्यांना जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. तुषार देशमुख , वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सपकाळ, डॉ. अभिषेक ठाकुर , तसेच आरोग्य सहाय्यक धनराज सपकाळे व राजेंद्र बारी यांचे मार्गदर्शन लाभले.