मध्य रेल्वेतर्फे आयोजन
भुसावळ ( प्रतिनिधी ) – मध्य रेल्वे धम्मचक्र प्रवर्तन दिवस- २०२५ निमित्ताने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पुणे ते नागपूर, नाशिक ते नागपूर, मुंबई ते नागपूर, नागपुर ते अकोला, नागपूर ते भुसावळ, सोलापूर ते नागपूर
दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे.
विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
१) पुणे -नागपूर विशेष गाडी
01215 विशेष गाडी दिनांक ०१.१०.२०२५ रोजी पुणे येथून १४.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०७.३० वाजता नागपूर येथे पोहचेल.
01216 विशेष गाडी दिनांक ०२.१०.२०२५ रोजी नागपूर येथून २३.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १६.२० वाजता पुणे येथे पोहचेल.
थांबे – दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड,चाळीसगांव, पाचोरा, जळगांव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा,धामणगांव, पुलगांव, वर्धा,अजनी.
संरचना: १६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह
२) नाशिकरोड ते नागपूर मेमो
01217 विशेष गाडी दिनांक ०१.१०.२०२५, ०२.१०.२०२५ आणि ०३.१०.२०२५ रोजी पुणे नाशिकरोड १८.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०८.०० वाजता नागपूर येथे पोहचेल. 01224 विशेष गाडी दिनांक ०२.१०.२०२५ रोजी नागपूर येथून १६.२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.१५ वाजता नाशिकरोड येथे पोहचेल.
01226 विशेष गाडी दिनांक ०३.१०.२०२५ आणि ०४.१०.२०२५ रोजी नागपूर येथून १२.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी २३.१५ वाजता नाशिकरोड येथे पोहचेल.
थांबे – मनमाड,चाळीसगांव, पाचोरा, जळगांव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा,धामणगांव, पुलगांव, वर्धा,अजनी.
संरचना: ८ कार मेमू
३) छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर विशेष गाडी
01019 विशेष गाडी दिनांक ०१.१०.२०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १४.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०६.१० वाजता नागपूर येथे पोहचेल.
01020 विशेष गाडी दिनांक ०२.१०.२०२५ रोजी नागपूर येथून २२.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १७.२० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहचेल.
थांबे – दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड,चाळीसगांव, पाचोरा, जळगांव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा,धामणगांव, पुलगांव, वर्धा,अजनी.
संरचना: १६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह
४) नागपूर -अकोला विशेष गाडी
01132 विशेष दि. ०२.१०.२०२५ रोजी नागपूर येथून १८.४० वाजता सुटेल आणि अकोला येथे त्याच दिवशी २३.३० वाजता पोहोचेल.
01131 विशेष दि. ०३.१०.२०२५ रोजी अकोला येथून ००.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी ०४.५० वाजता पोहोचेल.
थांबे: अजनी, वर्धा ,पुलगाव, धामणगाव,बडनेरा, मूर्तिजापूर.
संरचना: १६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह
५) भुसावळ ते नागपूर विशेष गाडी
01213 विशेष गाडी दिनांक ०२.१०.२०२५, ०३.१०.२०२५ आणि ०४.१०.२०२५ रोजी भुसावळ येथून ०५.०० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी १२.२० वाजता नागपूर येथे पोहचेल.
01214 विशेष गाडी दिनांक ०१.१०.२०२५, ०२.१०.२०२५ आणि ०३.१०.२०२५ रोजी नागपूर येथून २१.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०४.०० वाजता भुसावळ येथे पोहचेल.
थांबे – मलकापूर, शेगांव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा,धामणगांव, पुलगांव, वर्धा,अजनी.
संरचना: ०८ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह
६) सोलापूर ते नागपूर विशेष गाडी
01029 विशेष गाडी दिनांक ०१.१०.२०२५ रोजी सोलापूर येथून ०९.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ०५.१० वाजता नागपूर येथे पोहचेल.
01030 विशेष गाडी दिनांक ०२.१०.२०२५ रोजी नागपूर येथून २३.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २३.४५ वाजता सोलापूर येथे पोहचेल.
थांबे – कुर्डूवाडी, दौंड, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड,चाळीसगांव, पाचोरा, जळगांव, भुसावळ, मलकापूर, शेगांव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा,धामणगांव, पुलगांव, वर्धा,अजनी.
संरचना: १६ सामान्य द्वितीय श्रेणी आणि २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह.