मध्य रेल्वेचा उपक्रम
जळगाव (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेतर्फे धम्मचक्र प्रवर्तन दिवस- २०२४ निमित्ताने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पुणेमार्गे मुंबई-नागपूर आणि नागपूर -भुसावळ – नाशिक रोड दरम्यान विशेष गाड्या चालवणार आहे.
१) लोकमान्य टिळक टर्मिनस – नागपूर अनारक्षित विशेष
विशेष दि. ११.१०.२०२४ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून १४.०० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०५.०० वाजता पोहोचेल.
थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सिंदी आणि अजनी. संरचना: १८ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये २ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन.
२) नागपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष
विशेष गाडी दि. १३.१०.२०२४ रोजी नागपूर येथून ००.२० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे त्याच दिवशी १९.०० वाजता पोहोचेल.
संरचना: ८ शयनयान (४ आरक्षित आणि ४ अनारक्षित), ४ द्वितीय चेअर कार, १ जनरेटर कार आणि १ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन
३) नागपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष
01218 विशेष नागपूर येथून दि. १२.१०.२०२४ रोजी २२.०५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १४.३५ वाजता पोहोचेल.
संरचना: १० शयनयान (५ आरक्षित आणि ५ अनारक्षित) आणि ९ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये १ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन.
01018 आणि 01218 साठी थांबे : सिंदी, सेवाग्राम (फक्त 01218 साठी), वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण आणि ठाणे.
४) नागपूर – पुणे अनारक्षित विशेष
01215 विशेष गाडी दि. १२.१०.२०२४ रोजी नागपूर येथून २३.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे दुसऱ्या दिवशी २०.०० वाजता पोहोचेल.
01215 साठी संरचना: १८ सामान्य द्वितीय श्रेणी ज्यामध्ये २ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन.
५) पुणे – नागपूर अतिजलद विशेष
01216 विशेष पुणे येथून दि. ११.१०.२०२४ रोजी १६.०० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०६.४५ वाजता पोहोचेल.
01216 साठी संरचना: ८ शयनयान (४ आरक्षित आणि ४ अनारक्षित), ४ द्वितीय सिटींग कार, १ जनरेटर कार आणि १ सामानासह गार्ड ब्रेक व्हॅन.
01215 आणि 01216 साठी थांबे : अजनी (फक्त 01216 साठी), सिंदी, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर आणि दौंड कॉर्ड लाइन.
६) भुसावळ – नागपूर- नाशिक रोड मेमू विशेष
01213 मेमू विशेष दि. १२.१०.२०२४ रोजी भुसावळ येथून ०४.२५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १२.०० वाजता पोहोचेल.
01214 मेमू विशेष दि. १२.१०.२०२४ रोजी नागपूर येथून २३.४० वाजता सुटेल आणि नाशिकरोड येथे दुसऱ्या दिवशी १४.१० वाजता पोहोचेल.
संरचना: १२ कार मेमू
01213 थांबे: मलकापूर, नांदुरा, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, चांदूर, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, सिंदी आणि अजनी.
01214 थांबे: सिंदी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, चांदूर, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, नांदुरा, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव आणि मनमाड.
आरक्षण: 01216, 01018 आणि 01218 या विशेष गाड्यांसाठी विशेष शुल्कासह बुकिंग दि. ७.१०.२०२४ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेस्थळावर उघडेल.
विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा. प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.