जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल कॉम्प्लेक्सच्या आवारात तीक्ष्ण हत्याराच्या धाकाने विद्यार्थ्यांना धमकावणार्या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
जळगाव शहरातील असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल कॉम्प्लेक्स परिसरात गुरूवारी ६ जानेवारी रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास एक तरूण हा नशेत असतांना हातात तिक्ष्ण हत्यार घेवून जाणाऱ्या व येणाऱ्या नागरीक व विद्यार्थी, विद्यार्थींनींना पैसे मागवून धमकावत होता. यावेळी काहीनी त्याला दुर्लक्ष केले असता त्यांच्यापाठीमागे लागून त्यांना तिक्ष्ण हत्याराचा धाक दाखत होता. यावेळी काही नागरीकांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी हे क्रीडा संकालाजवळ येवून तरूणाला ताब्यात घेवून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात नेण्यात आले. जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तरूणावर कारवाई करण्याचे काम सुरू होते.