जळगाव;-वाळूने भरलेला ट्रॅक्टरने सायकलस्वाराला धडक दिल्याने ५४ वर्षीय व्यक्ती जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी खान्देराव नगर परिसरात घडली . मेहबुब खान अफिस खान (वय-५४) रा. पिंप्राळा हुडको असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मेहबुब खान अफिस खान हे आज गुरूवारी सकाळी ११.३० वाजता ते भाजीपाला घेण्यासाठी सायकलने खंडेराव नगरात आले. भाजीपाला घेवून आपल्या घरी परतत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली त्यात ते जागीच ठार झाले. घटनेची माहिती मिळताच पिंप्राळा हुडको परिसरातील नागरीकांना घटनास्थळी गर्दी केली होती. घटना घडताच ट्रॅक्टरचालक ट्रॅक्टर घेवून पसार झाला याप्रकरणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.








