• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 27, 2026
in 1xbet russia, casino, mostbet az 90, mostbet azerbaijan, mostbet kirish, mostbet ozbekistonda, pagbet brazil, PinUp apk, slot, vulkan vegas De login, Vulkan Vegas Germany, क्राईम, खान्देश, जळगाव, जैन कंपनी, नवी दिल्ली, भारत, महाराष्ट्र, मुंबई
0
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

जळगाव प्रतिनिधी : उधारीपोटी दिलेला सुमारे २६ लाख ३२ हजार ८४६ रुपयांचा धनादेश अनादरित (चेक बाऊन्स) झाल्याप्रकरणी परभणी येथील वितरक पांडुरंग ट्रेडिंग कंपनीचे सूर्यकांत सिताराम कछवे यांना जळगाव न्यायालयाने दोषी ठरविले आहे. या प्रकरणात न्यायालयाने आरोपीस एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली असून, संबंधित कंपनीस ३० लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून अदा करण्याचे आदेश दिले आहेत.

सूर्यकांत सिताराम कछवे यांनी सन २०१५ मध्ये जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीकडून झालेल्या आर्थिक व्यवहारातील उधारीपोटी २६ लाख ३२ हजार ८४६ रुपयांचा धनादेश दिला होता. कंपनीच्या वतीने सदर धनादेश नियमानुसार बँकेत सादर करण्यात आला. मात्र, संबंधित धनादेश अनादरित होऊन बँकेकडून परत आला. धनादेशाचा अनादर झाल्यानंतर कंपनीच्या वतीने कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली. या प्रकरणी जैन इरिगेशन सिस्टिम्स लि. कंपनीने संबंधित व्यक्तीविरुद्ध जळगाव न्यायालयात फौजदारी प्रकरण क्र. ४३२१/२०१५ दाखल केले. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान आरोपीने दिलेला धनादेश हा कंपनीकडील उधारीच्या रकमेपोटी देण्यात आला होता,

ही बाब कंपनीच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. धनादेश, आर्थिक व्यवहार तसेच प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे व कायदेशीर बाबींच्या आधारे न्यायालयात कंपनीच्या वतीने अॅड. निशांत अत्रे यांनी बाजू मांडली. दीर्घकाळ चाललेल्या या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने २० ऑगस्ट २०२६ रोजी निकाल दिला. न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच संबंधित कंपनीस ३० लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून अदा करण्याचे आदेश दिले आहेत. धनादेशाच्या मूळ रकमेपेक्षा अधिक नुकसानभरपाईचा आदेश देण्यात आल्याने या निकालाकडे आर्थिक व्यवहारांच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण निर्णय म्हणून पाहिले जात आहे.

सदर प्रकरणात जैन इरिगेशन सिस्टिम्स लि.च्या वतीने अ‍ॅड. निशांत अत्रे यांनी न्यायालयीन कामकाज पाहिले. तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. चंद्रकांत सिताराम कछवे यांनी बाजू मांडली. धनादेशाद्वारे होणारे व्यवहार हे विश्वास आणि आर्थिक बांधिलकीवर आधारित असतात. धनादेश देताना त्यामागील आर्थिक जबाबदारी पूर्ण करण्याची अपेक्षा असते. मात्र, धनादेश अनादरित झाल्यास संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई होऊ शकते. या प्रकरणातील निकालामुळे धनादेशाद्वारे होणाऱ्या आर्थिक व्यवहारांमध्ये कायदेशीर जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित झाले आहेत

Tags: https://kesariraj.com/dha/
Previous Post

‘D+’ औद्योगिक धोरणाचा प्रस्ताव तातडीने पुढील मंजुरीसाठी सादर करा — उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत

Next Post

८३ वर्षीय वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
८३ वर्षीय वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

८३ वर्षीय वृद्ध रुग्णाचे मृत्यूशी दोन हात मेंदूवरील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर व्हेंटिलेटरवरील रुग्ण सुखरूप घरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान
खान्देश

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड
खान्देश

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघटनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील यांची निवड

October 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये संशोधन लेखन व प्रकाशनावर मार्गदर्शन

October 14, 2026
गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑटोमोबाईल व इलेक्ट्रिक व्हेईकल तंत्रज्ञानावर तज्ज्ञ व्याख्यान

डॉ. केतकी पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा

October 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!