आ. राजेश एकडे यांचे निमगावातील सभेत प्रतिपादन
उमेदवार श्रीराम पाटील यांचा केला प्रचार
मलकापूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील निमगाव येथे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम दयाराम पाटील यांच्या प्रचारार्थ मलकापूरचे आमदार राजेश एकडे यांची सभा घेण्यात आली. देशात बदलाचे वारे वाहत आहेत, श्रीराम पाटील भाग्यवान आहेत की, त्यांनी या वेळेला उमेदवारी घेतली आहे. त्यांचा विजय हा नक्की आहे. देशभरात पंतप्रधान मोदी यांचेविरुद्ध लाट निर्माण झाली आहे. गेल्या दहा वर्षात जनतेला भूलथापेशिवाय दुसरं काही मिळालं नाही. श्रीराम पाटील यांनी शून्यातून विश्व निर्माण करत हजारो कुटुंबांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आपल्या भागाचे ते खासदार झाल्यास नक्कीच मोठे उद्योगधंदे आणतील व बेरोजगारीचा प्रश्न मिटवतील, असेही एकडे म्हणाले.
निमगाव परिसर नेहमीच माझ्या पाठीशी उभा राहिला आहे, आता श्रीराम दयाराम पाटील यांच्याही पाठीशी मी उभा राहील यात शंका नाही. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी पेक्षाही आताचे वातावरण महाविकास आघाडीला पोषक आहे त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. विदर्भातील दहाच्या दहा सीट या महाविकास आघाडी जिंकत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. असे यावेळी आपल्या भाषणात आमदार राजेश एकडे म्हणाले. या सभेत यावेळी प्रसन्नजीत पाटील, अरविंद कोलते, संतोष रायपुरे, वनिता गायकवाड यांचीही भाषणे झाली. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी १३ मे रोजी सोमवारी “तुतारी वाजवणारा माणूस” या चिन्हावर मत देऊन श्रीराम पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.