• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

देवळाली – भुसावळ शटल लवकरच पूर्व निर्धारित वेळेनुसार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 8, 2023
in Uncategorized
0

खासदार उन्मेष पाटील यांच्या प्रयत्नाला यश

पाचोरा (प्रतिनिधी) – चाळीसगाव,पाचोरा ते जळगाव दरम्यान नियमित ये – जा करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी धावणारी देवळाली भुसावळ एक्सप्रेस (शटल) लवकरच पूर्वनिर्धारित वेळेनुसार सुरू करण्यात येईल असे आश्वासन रेल्वेमंत्री ना.रावसाहेब दानवे – पाटील यांनी दिल्याने प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.जळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार मा. उन्मेषदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाचोरा येथील भाजपाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांच्यासह पाचोरा रेल्वे स्टेशन सल्लागार समितीच्या शिष्टमंडळाने रेल्वेमंत्री ना. रावसाहेब दानवे व रेल्वे बोर्डाचे चेअरमन अनिल कुमार लाहोटी यांची दिनांक ३ व ४ ऑगस्ट रोजी दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान दोनही मान्यवरांनी शिष्टमंडळाला शटल रेल्वे पूर्वनिर्धारित वेळेनुसारच सुरू बाबत आश्वासन दिले.

खान्देशातील प्रवाशांच्या सोयीची शटल रेल्वे सेवा म्हणजेच देवळाली – भुसावळ एक्सप्रेसच्या वेळेत कोरोना काळात बदल झाला होता.परिणामी मनमाड ते भुसावल दरम्यान दररोज ये – जा करणारे प्रवासी,नोकरदार व चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले होते.प्रवाशांच्या समस्या लक्षात घेऊन खासदार उन्मेषदादा पाटील व पाचोरा भाजपा तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे यांचे सह पाचोरा रेल्वे स्टेशन सल्लागार समितीचे सदस्य तथा प्रवासी परिषदेचे जनरल सेक्रेटरी प्रभू पाटील, सल्लागार सदस्य गिरीश बर्वे ,अनिल चांदवानी, राजेंद्र बडगुजर,निलेश कोटेचा यांनी नवी दिल्ली येथे रेल्वेमंत्री ना.रावसाहेब दानवे व रेल्वे बोर्डाचे चेअरमन मा.अनिल कुमार लाहोटी यांची भेट घेतली.या भेटीत देवळाली-भुसावल शटल च्या मागणीबाबत लोकसभेचे अधिवेशन संपल्यावर लगेचच होणाऱ्या रेल्वे बोर्डाच्या बैठकीत या विषयावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन रेल्वे मंत्र्यांनी दिले. यावेळी प्रवाशांच्या सोयीसाठी वेगवेगळी निवेदने मान्यवरांना देण्यात आली,या निवेदनावर उपरोक्त उपस्थित सदस्यांसह हिरालाल चौधरी, ॲड. प्रशांत नागणे, प्रदीपकुमार संचेती, राजू धनराळे व प्रमोद सोमवंशी यांच्यासह अनेक प्रवासांच्या स्वाक्षरी आहेत.

या दिल्ली भेटीत दोन्ही मान्यवरांनी शटल रेल्वेची आवश्यकता व उपयोगिता जाणून घेतली. शटलच्या पूर्वनिर्धारित वेळेला पर्याय म्हणून अजंता एक्सप्रेस मनमाड ऐवजी भुसावळ पासून सुरू करण्याबाबत आणि धुळे ते चाळीसगाव मेमो रेल्वे सेवा जळगाव पर्यंत वाढविण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. तसेच अक्कलकोट, तुळजापूर व पंढरपूरला जाणाऱ्या खानदेशातील भाविकांसाठी साप्ताहिक धावणाऱ्या यशवंतपुरम- अहमदाबाद एक्सप्रेस ला पाचोरा व चाळीसगाव येथे थांबा देण्यात यावा अशी मागणीही शिष्टमंडळातर्फे करण्यात आली.

अमृत भारत योजनेत पाचोरा रेल्वे स्थानकाचा समावेश

या भेटीदरम्यान खासदार उन्मेष दादा पाटील यांनी पाचोरेकरांसाठी अत्यंत आनंददायी घोषणा करत “अमृत भारत” योजनेत पाचोरा रेल्वे स्थानकाचा समावेश केल्याचे जाहीर केले. खासदार उन्मेष दादा यांच्या प्रयत्नाने पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील अमृत भारत योजनेत पाचोरा रेल्वे स्थानकाचा समावेश झाल्याने भारतातील अत्याधुनिक रेल्वे स्टेशन प्रमाणेच पाचोरा स्थानकाचा अभूतपूर्व विकास होऊन स्थानकाचा चेहरा मोहरा बदलणार आहे. सुमारे ३७ कोटी रुपयांचा विकास निधी यासाठी मंजूर करण्यात आल्याने रेल्वे प्रवासी, प्रवासी परिषद व पाचोरा परिसरातील जनतेने खासदारांचे कौतुक केले आहे.


 

Tags: #kha.unmesh patil yanchya prayatnana yash newshttps://kesariraj.com/devlali-busawal-shatal-velenusar/
Previous Post

जिजाऊ बिग्रेडने गोंडगाव येथील पीडित कुटुंबाची घेतली भेट

Next Post

अरविंद बडगुजर यांचा उत्कृष्ठ नेपथ्य म्हणून गौरव

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अरविंद बडगुजर यांचा उत्कृष्ठ नेपथ्य म्हणून गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !
1xbet russia

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

शेतात मशागत करताना मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 20, 2025
भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon