जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील आकाशवाणी चौकातील अक्षया सिटी स्कॅन सेंटरतर्फे सर्वसामान्यांना परवडतील अशा दरात सर्व प्रकारच्या सिटीस्कॅन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सिटीस्कॅनसाठी रुग्णांवरील आर्थिक बोजा कमी व्हावा, या उद्देशाने ना नफा ना तोटा तत्त्वावर ही सुविधा सुरु करण्यात आली आहे.
सध्या वैद्यकीय क्षेत्रात विविध आजारांचे निदान व पुढील उपचार करण्यासाठी सिटीस्कॅन तपासणीची आवश्यकता असते. मात्र सिटीस्कॅनचे दर हे गोरगरीब आणि सर्वसामान्य रुग्णांना न परवडणारे असतात. अशा रुग्णांच्या सोयीसाठी अक्षया सिटी स्कॅन सेंटरतर्फे अत्यंत माफक दरात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी अत्याधुनिक असे 32 स्लाइसचे जीई तंत्रज्ञान युक्त यंत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामुळे रुग्णांचे अचूक निदान शक्य होत आहे. ही सिटीस्कॅन सुविधा केवळ 900 रुपयांपासून उपलब्ध असून, वेगवेगळ्या भागांच्या सिटीस्कॅनसाठी त्याच्या प्रकारानुसार अत्यंत माफक दरात येथे सिटीस्कॅन उपलब्ध झाले आहे. गोरगरीब रुग्णांना आर्थिक दिलासा मिळावा, या उद्देशाने ना नफा ना तोटा तत्वावर ही सुविधा उपलब्ध असेल. कोणत्याही रुग्णालयातून सिटीस्कॅनसाठी आलेल्या सर्व रुग्णांना ही माफक दराची सुविधा उपलब्ध आहे, असे अक्षया सिटीस्कॅन सेंटरतर्फे जाहीर करण्यात आले आहे.
संपर्क : मो. 8181984848