• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

देवकर मल्टिस्पेशालिटीमध्ये महात्मा फुले जनआरोग्य व आयुष्मान भारत योजना लागू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 22, 2021
in जळगाव
0

जळगाव ( प्रतिनिधी ) –  गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात राज्य शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व केंद्र शासनाची आयुष्मान भारत योजना लागू झाली आहे. त्यामुळे या रुग्णालयातील आरोग्यसेवेचा मोफत लाभ पात्र लाभार्थ्यांना घेता येणार आहे.

कोविडच्ज्ञा दुसऱ्या लाटेतील रुग्णांवरील यशस्वी उपचारानंतर 22 जुलैपासून हे रुग्णालय मल्टिस्पेशालिटी आरोग्यसेवेसाठी सुरू झाले आहे. रुग्णालयात अत्याधुनिक यंत्रणा, तंत्रज्ञ व विविध आजारांवरील तज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध आहे.

गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी रुग्णालयातील सुविधांची काटेकोर पाहणी, पडताळणी राज्य व केंद्र शासनाच्या समितीने केली. या समितीच्या अहवालानुसार शासनाने महात्मा फुले जनआरोग्य योजना या रुग्णालयाला मंजूर केली आहे. आता या रुग्णालयात गरजू, सामान्य रुग्णांवर योजनेअंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.

शासनाच्या योजना अनेक रुग्णालयांना लागू झाल्या असल्या, तरी एकाच छताखाली मुंबई-पुण्याच्या तोडीस तोड सेवा व विविध आजारांवरील उपचार एकाच छताखाली उपलब्ध असल्याने मोफत उपचारासाठी नागरिकांना लाभ होणार आहे. या मोफत उपचारात विविध प्रकारच्या महागड्या शस्त्रक्रिया देखील केल्या जाणार आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार यंत्रणा, तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता, प्रशिक्षित नर्सिंग स्टाफ उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यामुळे रुग्णांना मोफत उपचार घेताना रुग्णालयातील उच्च दर्जाच्या सुविधांचा लाभ घेण्याचे समाधान मिळणार आहे.

देवकर मल्टिस्पेशालिटीमध्ये रुग्णांवर या योजनेअंतर्गत मोफत उपचार व शस्त्रक्रियांसाठी सुसज्ज स्वतंत्र विभाग तत्पर ठेवण्यात आले आहेत. मेंदू व मणके विकार शस्त्रक्रिया, मूत्रविकार व किडनीचे विकार, क्रिटिकल केअर मेडिसिन, प्लास्टिक शस्त्रक्रिया यासाठी सुपरस्पेशलिटी विभाग कार्यरत आहेत. बालरोग, नेत्ररोग, स्त्रीरोग व प्रसूती शस्त्रक्रिया, जनरल शस्त्रक्रिया, अपघातातील जखमींवरील शस्त्रक्रिया, दंतरोग, त्वचा व गुप्तरोग, छातीचे विकार, फिजिओथेरपी विभाग या विभागाद्वारे उपचार व शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. स्वतंत्र पॅथॉलॉजी लॅब उपलब्ध असून 14 खाटांचा उपकरणांनी सुसज्ज आयसीयू विभाग आहे. गरजू रुग्णांना 24 तास ऑक्सिजनची सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी रुग्णालयाचा स्वतःचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे.
अधिक माहितीसाठी डॉ. नितिन पाटील मो क्रमांक 9422977071 व 7507724200 या वर संपर्क साधावा, असे रुग्णालय प्रशासनाने कळविले आहे.


 

 

Previous Post

कंडारीच्या सरपंच सुवर्णा कोळी अपात्र

Next Post

टाकळी प्र.चा. गावाला मिळणार कायम शुध्द पाणी…

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

टाकळी प्र.चा. गावाला मिळणार कायम शुध्द पाणी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
1xbet russia

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका
1xbet russia

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

कापड दुकानाला भीषण आग; लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक

February 14, 2026
कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या
1xbet russia

कर्जबाजारी शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

February 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

तरुण मजुराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

February 14, 2026
सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

सिंगल यूज प्लास्टिक बंदीसाठी महापौर दीपमाला काळे यांची कडक भूमिका

February 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon