२३० प्रतिनीधींचा उत्स्फुर्त सहभाग ; विविध विषयांवर मंथन
जळगाव ( प्रतिनिधी ) – डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल, जळगाव (खु.) येथे डेटिंग स्कॅनपासून ग्रोथ स्कॅनपर्यंत: प्रसूतिपूर्व अल्ट्रासाऊंडचे सुलभीकरण या विषयावर संकरीत पध्दतीने निरंतर वैद्यकीय शिक्षण (सीएमई) कार्यशाळा उत्साहात पार पडली.



या शैक्षणिक कार्यशाळेचे आयोजन रेडियोलॉजी विभागाशी संबंधित असून डॉ. केतकी पाटील हॉल, डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय जळगाव (खु.) येथे उदघाटन महाविद्यालयाचे चेअरमन डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, अधिष्टाता डॉ प्रशांत सोळंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रेडीओलॉजी विभाग प्रमुख डॉ. रेडडी, प्रमुख वक्ते डॉ. रुचिता बागडी डॉ. किरण पाटील डॉ. अंजली भिरूड, डॉ. वैशाली चौधरी,डॉ. राजकिरण राठी,इ मान्यवर यावेळी उपस्थीत होते. कार्यशाळेत प्रसूतीमध्ये अल्ट्रासाऊंडच्या विविध पैलूंवर सखोल माहिती, सत्रे आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिके (डेमोंस्ट्रेशन) घेतली गेली. सहभागी तज्ञांना २ एमएमसी क्रेडिट पॉइंट्सही येथे प्रदान केले. प्रमुख सत्रांमध्ये पहिला ट्रायमिस्टर स्कॅन – एनटी आणि एनबी व्यतिरिक्त प्रसूती डॉपलरची भूमिका एएनसीमध्ये मातृत्व मृत्यू प्रतिबंधातील रेडिओलॉजीची भूमिका यावर तर दुस र्या सत्रात प्रात्याक्षिकव्दारे एनटी स्कॅन कसे करावे, डेमोंस्ट्रेशन अनोमली स्कॅन करताना ट्रिक्स (डेमोंस्ट्रेशन) प्रसूती डॉपलर प्रत्यक्ष करताना टिप्स दिल्या गेल्यात. यावेळी डॉ. रुचिता बागडी डॉ. किरण पाटील डॉ. अंजली भिरूड, डॉ. वैशाली चौधरी, डॉ. राजकिरण राठी या तज्ञांनी मार्गदर्शन करतांना पहिल्या तिमाहीतील (११-१४ आठवडे) एनटी आणि एनबी स्कॅनच्या करावयाच्या पध्दती तसेच यावर असलेल्या पर्यायाबाबत भुमिका मांडली तर प्रसूतिपूर्व काळजीमध्ये ऑब्स्टेट्रिक डॉप्लरची भूमिका अॅनामली स्कॅन बाबत माहिती देतांना डॉपलर उच्च-जोखीम असलेल्या गर्भधारणेत, जिथे बाळाच्या स्थितीबद्दल चिंता असते, तेथे याचा वापर केल्याने फायदे दिसून येतात.तसेच अॅनामली स्कॅन करतांना घ्यावयाची काळजी याबाबत माहीती दिली. मातृमृत्यू प्रतिबंधात रेडिओलॉजीची भूमिका यावर गोपनियता पाळणे गरजेचे असून सध्या याबाबत नियमांचे पालन होत नसल्याची खंत व्यक्त केली. याबाबत असलेल्या कायदयाबाबतही माहिती दिली.याचबरोबर ऑब्स्टेट्रिक डॉप्लर करण्यासाठीच्या टिप्स देतांना विविध पर्याय सुचवले. या कार्यशाळेत ऑनलाईन १६८ आणि ऑफलाईन ६२ अशा २३० प्रतिनीधींनी सहभाग नोंदविला. या एक दिवसीय कार्यशाळेचा समारोप सायंकाळी करण्यात आला. यशस्वीतेसाठी रेडीओलॉजी विभागाचे निवासी वैद्यकिय अधिकारी,कर्मचारी आणि शिक्षकेतर कर्मचा यांनी परिशम घेतले. समारोप प्रसंगी सहभागी तज्ञांना प्रमाणपत्र व पदक मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.









