नूतन मराठा महाविद्यालयात कारगिल विजय दिवस साजरा
जळगाव (प्रतिनिधी) :- नूतन मराठा महाविद्यालय येथे कारगिल विजय दिवस मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी वीर जवानांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.
दिनांक २६ जुलै १९९९ रोजी भारतीय जवानांनी पाकिस्तानशी लढून कारगिल युद्धात मिळवलेल्या विजयाच्या स्मृती जागवण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. कार्यक्रमाची सुरुवात कारगिल युद्धातील वीर जवानांना लेफ्टनट कर्नल अश्विन वैद्य यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली देण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून १८ महाराष्ट्र बटालियनचे समादेशक अधिकारी लेफ्टनट कर्नल अश्विन वैद्य यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी कारगिल युद्धाचे महत्त्व, भारतीय सेनेचे शौर्य, पराक्रम, त्याग, निष्ठा तसेच देशसेवेचे मोल सांगितले.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के बी पाटील होते. तसेच मंचावर डॉ. एन जे पाटील, सुभेदार मेजर सुरेशकुमार, प्रा.शिवराज पाटील, प्रा.हेमाक्षी वानखेडे, प्रा. घनश्याम पाटील उपस्थित होते. यावेळी सभागुहात सुभेदार ओम प्रकाश, हवालदार विनय शर्मा, हवालदार फारूक, महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.