नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) ;- देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं होतं. आरोग्य व्यवस्थेचा बराच बोजवारा उडालेला दिसला. आता दुसरी लाट ओसरत असतानाच डेल्टा प्लस या व्हेरिएंटनं डोकं वर काढलं आहे. या व्हेरिएंटचे देशभरात 40 रुग्ण आढळून आलेत. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. महाराष्ट्र, केरळसह इतर राज्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं अलर्ट जारी केला आहे. त्यातच आता डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे तिसरी लाटेचा धोका असल्याचं सर्वत्र बोललं जात आहे. सर्वसामान्यांच्या मनात तिसऱ्या लाटेची भीती निर्माण झाली आहे. यावर आता तज्ज्ञांनी दिलासादायक खुलासा केला आहे.
डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे तिसरा लाट येण्याची शक्यता आहे, यासंबंधीचे अद्याप कोणतेही पुरावे नसल्याचं तज्त्रांनी म्हटलं आहे. देशातील सर्वोच्च जीनोम सिक्वेंसर याचं असं म्हणणं आहे की, कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे तिसरी लाट येणार असल्याचा कोणताही पुरावा नाही.
दिव्य भास्करनं दिलेल्या वृत्तानुसार, इन्स्टिट्यूट ऑफ जेनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (IGIB)चे संचालक डॉ. अनुराग अग्रवाल म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट अद्याप संपलेली नाही याची काळजी आपण बाळगली पाहिजे.
देशातील बर्याच भागात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळलेत. मात्र देशातील टॉप डॉक्टर आणि जीनोम सिक्वन्सर्सनी अशी भीती निराधार असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, कोरोनाच्या या उत्परिवर्तित स्वरूपाचा तिसर्या लाटेशी काही संबंध नाही.