नवी दिल्ली (वृत्तसंस्था) – दिल्लीच्या उत्तमनगर भागात राहणारा नागरिकाला कोरोना विषाणूंची बाधा झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. त्यामुळे देशातील कोरोना बाधितांची संख्या 31 वर पोहोचली आहे. हा बाधीत मलेशिया आणि थायलंडला जाऊन आल होता, असे आरोग्य मंत्रालयाचे विशेष सचिव संजीव कुमार यांनी सांगितले.
आजारी पडल्यामुळे वैद्यकीय देखरेखीखाली ठेवलेल्या रुग्णांची संख्या 30 हजारवर पोहोचली आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी दिल्लीतील सर्व प्राथमिक शाळा महिनाभर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केरळमध्ये बाधीत झालेले तीन जण आता बरे झाले आहेत. त्यामुळे देशात सक्रीय बाधीतांची संख्या 28 झाली आहे. बाधीतांच्या निकटच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे.बाधीतांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध ही साथ समाजात पसरू नये म्हणून आवश्यक बाब आहे. कोरोना बाधीत हे मुख्यत: प्रवास केलेल्यांमध्ये आढळले आहेत. तसेच समाजातून पसरलेल्या घटना समोर आल्या आहेत. सर्व राज्यांना आणि जिल्हाधिकाऱ्यांना शिघ्र प्रतिसाद दल उभारण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्या जिल्हा, गण आणि गाव पातळीवर उभाराव्यात, असे आदेश दिल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.सर्व बाधीत सुरक्षित आहेत. केरळमधील तीन जण बरे झाले असून ते आता संसर्गहीन बनले आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.