नवी दिल्ली – भारताच्या पुरुष हॉकी संघाने जागतिक हॉकी क्रमवारीत चौथ्या स्थानी झेप घेतली आहे. प्रो-लिग हॉकी स्पर्धेतील सरस कामगिरीमुळे क्रमवारीत संघाचे स्थान उंचावले आहे. 2003 सालानंतर भारतीय हॉकी संघाची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या बलाढ्य अर्जेंटिना संघाला पिछाडीवर टाकून भारतीय हॉकी संघाने चौथे स्थान पटकावले आहे. बेल्जियम या क्रमवारीत अग्रस्थानी असून ऑस्ट्रेलियाने दुसरे स्थान कायम राखले आहे.
नेदरलॅंड संघ तिसऱ्या स्थानावर आहे. महिला संघांच्या क्रमवारीत भारतीय महिला हॉकी संघाने 9 वे स्थान मिळविले आहे. 1 जानेवारी 2020 पासून आंतरराष्ट्रीय हॉकी संघटनेने जागतिक क्रमवारीत गुणपद्धतीची फेररचना केली आहे.