जळगाव ( प्रतिनिधी ) — दुसऱ्याच्या डेबिटकार्डावरून बेकायदा पैसे काढून वापरलेले पैसे आरोपीने पोलिसांसमक्ष परत करीत फिर्यादीची माफीही मागितली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 16 सप्टेंबररोजी रोजी धनंजय बारी ( रा श्रीकृष्ण नगर ) यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या एटीएममधून पैसे काढले. त्यांचे डेबिटकार्डवर पिन कोड लिहायला विसरून गेले होते. त्यानंतर दुसऱ्याने या डेबिटकार्डाचा गैरवापर केला. आणि दोन वेळा 10 / 10 हजार रुपये काढले. व 2800/-रुपयांचे पेट्रोल त्यांचे इंडिका गाडीत डेबिट कार्डचा वापर करुन भरले. 22800/ – रुपयांचा अज्ञात व्यक्तीने अपहार केला. त्यानंतर फिर्यादीने नमूद डेबिट कार्ड बंद केले.
जिल्हापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावर भादवि-403 नुसार दाखल करण्यात आला. पो. नि. रामदास वाकोडे यांचे मार्गदर्शनानुसार अपहार कारणारांचा हे कॉ महेंद्र बागुल, महेंद्र पाटील, मनोज पवार यांनी शोध घेतला. अपहार करणारे ज्ञानेश्वर कोळी ( रा कुसुम्बा ) हेच असलेचे निष्पन्न झाले. नंतर आरोपीने नमूद डेबिट कार्ड व 22800/- रुपये तक्रारदार यांना जिल्हापेठ पोलीस ठाण्यात येऊन परत दिले. व चुकीची माफी मागितली. पुढील कारवाई पोलीस करीत आहेत.