जळगावातील मनोरुग्ण अन् गाडेगावातील घटना
जामनेर (प्रतिनिधी) – पेट्रेलपंपाच्या स्वच्छतागृहाशेजारी तो बसला होता़ भर पावसात कोणाला कल्पनाही नव्हती.त्या ठिकाणी एक ग्रामस्थ आला आणि काय अचानक हा त्रिशुल घेऊन मागेच सुटला आपला जीव वाचविणारा ग्रामस्थ मॅनेजरकडे पळाला आणि काय झालेय हे बघण्या आधीच त्याने मॅनेजरवरच वार केला . जळगावातील हा व्यक्ति मनोरुग्ण असल्याचे निष्पन्न झाले असून नागरिकांनी त्याला चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले आहे़
गाडेगाव येथील किशोर कोल्हे यांच्या मालकीच्या दुर्गा पेट्रोलपंपावरील ही घटना़ दुपारी तीन ते चार वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू होता़ जळगाव येथील सुप्रिम कॉलनीतील रहिवासी जनार्दन गंगाराम खोटे वय ५७ हा त्रिशुल घेऊन बसलेला होता़ पाऊस थांबल्यानंतर गाडेगाव येथील रहिवासी चेतन हा बाथरूमकडे गेला असता़ जनार्दना हा त्रिशूल घेऊन त्याच्या मागे पळाला़ जीव वाचविण्यासाठी चेतन याने पेट्रोलपंपाकडे धाव घेतली व यावेळी मॅनेजर गजानन भाऊराव निकम हे नेमका काय प्रकार आहे़ हे पाहण्यासाठी गेले असता
जनार्दने त्यांच्याच पोटावर व छातीवर त्रिशुलाने वार केले़ त्यांनी आरडोओरड केल्यानंतर ग्रामस्थांनी धाव घेतली़ जनार्दनने पळ काढला मात्र, तो एका फलकाला धडकला़ त्याला ग्रामस्थांनी चोप दिला व त्याला पोलिसांच्या हवाली केले़ यात तो जखमीही झाला़ त्याला डॉ़ उल्हास पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे़. तर गजानन वर जळगाव येथील खाजगी हाँस्पिटल मध्ये उपचार सुरू आहे.
जनार्दन दोन महिन्यांपासून घरातून निघून गेला आहे़ पत्नी व मुलगा त्याला त्रस्त असल्याचे व मानसोपचारतज्ञांकडे उपचार सुरू असल्याचे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले़ घटनेबाबत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे़ जामनेरचे पोलीस निरीक्षक प्रतापराव इंगळे यांनी घटनास्थळी पाहणी केली़