खम्मम;- गुन्ह्याच्या आरोपाखाली पोलिसांनी चक्क दोन कोंबडय़ांना अटक केल्याचा विचित्र प्रकार तेलंगणा येथे घडला आहे. एवढेच नव्हे तर गेल्या 25 दिवसांपासून या कोंबडय़ा पैदेत आहेत. खम्मम जिल्ह्यातील मिदीगोंडा येथे कोंबडय़ांची झुंज लावण्याचा खेळ सुरू होता. पोलिसांनी घटनास्थळी धाड टापून काही लोकांना अटक केली होती. पुरावा म्हणून या कोंबडय़ांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर सट्टेबाज जामिनावर सुटले. कोंबडय़ांची सुटका झालेली नाही. न्यायालयात सुनावणीनंतर सुटका होणार आहे.








