जळगाव – येथे संविधान बचाव नागरी कृती समिती व संयुक्त किसान मोर्चा तर्फे किसान तिरंगा रॅली काढण्यात आली सदर रॅली दिल्ली येथील शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ काढून शेतकरीविरोधी तीन कृषी काळे कायदे रद्द करा या प्रमुख मागणीसाठी होती या रॅलीचे नेतृत्व महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी केले प्रारंभी भारतीय संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आले आणि भारतीय संविधानाचे प्रास्ताविक वाचन करून शपथ देण्यात आली. या रॅलीत प्रजासत्ताक दिनाचा विजय असो जय जवान जय किसान शेतकरीविरोधी काळे कायदे रद्द करा धर्मनिरपेक्ष भारत जिंदाबाद अशा घोषणा देत रॅली जळगाव शहराच्या मध्यवर्ती भागातून काढून शिवतीर्थ मैदानावर अभिवादन सभेत रॅलीची सांगता करण्यात आली.छत्रपती शिवाजी महाराजांना माल्यार्पण करून सत्यशोधक विद्यार्थी संघटनेतर्फे शेतकरी आंदोलनावर पथनाट्य सादर करण्यात आले याप्रसंगी मुकुंद सपकाळे यांनी आपल्या भाषणात भारतीय संविधानाचे लोकशाहीचे संवर्धन करण्यासाठी पेटून उठले पाहिजे जेणेकरून संविधानाची पायमल्ली करण्याची हिंमत कोणी करणार नाही यावेळी वंदना चौधरी, मुक्ती हारून नदवी, अमोल कोल्हे, फारुक शेख, अयाज आली, रमेश सोनवणे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रीतिलाल पवार यांनी करून आभार प्रदर्शन हरिश्चंद्र सोनवणे यांनी केले. रॅली यशस्वी करण्यासाठी समाधान सोनवणे. भारत सोनवणे, फाईन पटेल,दिलीप सपकाळे, मुस्ताक सालार, ईश्वर मोरे, श्रीकांत मोरे, कॉम्रेड अखिल, बापू कोळी, सुरेश तायडे साहेबराव वानखेडे यांनी परिश्रम घेतले या वेळी दत्तू पाटील,संजय सपकाळे, उमेश गाढे, राजू सवरणे, दामू भारंबे, सलीम इमानदार, राहुल भालेराव,विजय मौर्य, गोलू लोहार,कृष्णा सपकाळे,पिंटू सपकाळे, चंदन बिराडे, विजय कुमार, प्रकाश दाभाडे, उज्वल निकम, किरण भोळे, नाना पाटील, कृष्ण जमदाडे,नगरसेवक राजू मोरे, भारत कर्डिले, जगदीश सपकाळे, दत्तू सोनवणे,दिझेड मोरे, कैलास तायडे, प्रा.फिर्दोष सिद्दिकी प्रा. कैकशा खान, प्रा.शबान खाटीक, प्रा. चांद खान इत्यादी शेकडो असंख्य महिला पुरुष विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








