अमळनेर;- डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आर एम बी के एस अंतर्गत प्रोटॉन या प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून शहरातील गोरगरीब लोकांना किराणा सामानाचे वाटप करण्यात आले.
विश्वरत्न तथा भारताचे पहिले कामगार मंत्री डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सामाजिक भान ठेवून आर एम बी के एस अंतर्गत प्रोटॉन या प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी यांनी शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून गोरगरीब गरजू कुटुंबातील लोकांना सढळ हाताने मदत केली.
या वेळी संघटनेचे जिल्हा सचिव मिलिंद निकम, जिल्हा उपाध्यक्ष प्रा भानुदास गुलाले, आर बी पाटील, अजय भामरे सर, प्रा जितेश संदानशीव, विजय वाडेकर, किरण मोहिते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.