शिरसोली (प्रतिनिधी ) जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.बो. येथिल ग्रामपंचायत सरपंचपदी महाविकास आघाडीचे प्रदिप रावसाहेब पाटील तर उपसरपंचपदी समाधान पुंडलिक जाधव यांची निवड करण्यात आली.

याबाबत सविस्तर माहिती अशी की जळगाव तालुक्यातील शिरसोली प्र.बो. येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच,उपसरपंच पदाची निवड करण्यात आली प्रथम सरपंच पदासाठी सीमा प्रविण पाटील, प्रदिप रावसाहेब पाटील, डिगंबर रामकृष्ण बारी ,प्रविण अशोक बारी तर उपसरपंच पदासाठी नितीन अर्जुन बुंधे, समाधान पुंडलिक जाधव यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
यानंतर सरपंचपदाचे उमेदवार असलेले प्रविण अशोक बारी यांनी दुपारी 12:50 ला माघार घेतली. यानंतर सीमा प्रविण पाटील यांनी दुपारी 1:50 ला माघार घेतली. तर.सरपंचपदाचे उमेदवार डिगंबर बारी व प्रदिप पाटील, तर उपसरपंच पदाचे उमेदवार नितीन बुंधे व समाधान जाधव यांचे उमेदवारी अर्ज निवडणूकसाठी ठेवण्यात आले.प्रदिप रावसाहेब पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे गुप्त मतदान करण्याबाबत लेखी अर्ज केला. यावरून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी गुप्त मतदान घेण्यास परवानगी दिली . यात गुप्त मतदान घेण्यात आले. यात 17 सदस्यांनी मतदान केले पण एक उमेदवाराचे मतदान या प्रक्रियेत बाद झाले . यामुळे ८-८ अशी संख्या झाली . त्यामुळे तेजस बारी या मुलाच्याहातून ईश्वरी चिठ्ठी काढण्यात आली . यात प्रदिप रावसाहेब पाटील यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने सरपंचपदासाठी प्रदिप रावसाहेब पाटील यांची निवडणूक निर्णय अधिकारीएस पी.पाटील यांनी निवड घोषित केली. तर उपसरपंचपदाचे उमेदवार नितीन अर्जुन बुंधे यांना 8 तर समाधान पुंडलिक जाधव यांना 9 असे गुप्त मतदान पडल्याने समाधान जाधव यांना उपसरपंचपदी निवडणूक निर्णय अधिकारी पाटील यांनी घोषित केले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अबुबकर शकील खाटीक,फौजिया शोएब खाटीक, शेख रईस इलियास ,निर्मलाबाई अर्जुन भिल्ल, सीमा प्रविण पाटील, आशाबाई मुरलीधर ढेंगळे, उषा अर्जुन पवार, नितीन अर्जुन बुंधे, डिगंबर रामकृष्ण बारी, भारती सुनील पाटील, रूपाली रवींद्र नेटके, आशाबाई सुरेश बारी ,प्रवीण अशोक बारी, शितल राजेंद्र खलसे ,श्रद्धा प्रशांत काटोले हे उपस्थित होते.
निवडणूक निर्णय अधिकारी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस पी.पाटील यांनी घोषित केले. यावेळी निवडणूक पार पाडण्यासाठी ग्राम विकास अधिकारी डी.आर.शिरतुरे व तलाठी भरत आर ननवरे यांनी काम पाहिले . कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे हवलदार जितेंद्र राठोड, निलेश भावसार ,राजू ठाकरे , पोलीस पाटील शरद पाटील ,श्रीकृष्ण बारी, यांनी चोख बंदोबस्त ठेवला. यावेळी ग्रामस्थांनी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचे अभिनंदन केले .







