यावल ;- राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यातर्फे आणि चोपड़ा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार सौ. लताताई सोनवणे, मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघ आमदार चंद्रकांतदादा पाटील तसेच शिवसेना उपजिल्हाप्रमुख तथा यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, विरावली ग्रामपंचायत सरपंच, आणि यावल तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाचे संचालक मुन्ना उर्फ तुषार पाटील यांच्यासह शिवसेना पक्षावर प्रेम करणाऱ्या व इतर सर्व स्तरातील बेरोजगार आणि खरोखर गरजवंत असणाऱ्यांना चांगल्या प्रतीच्या पॅकिंग असलेल्या किराणा वस्तूचे वाटप करण्यात आले.
यावल कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात दिनांक 6 बुधवार रोजी दुपारी व त्या नंतर यावल तालुक्यात ठिक-ठिकाणी गरीब गरजवंतांना किराणा वस्तू वाटप करण्यात आल्या एका मोठ्या पॅकिंग असलेल्या पिशवीत गुजरात गोल्ड चक्की ( गव्हाचा ) आटा पाच किलो, प्रकाश प्रीमियम चहा 100 ग्रॅम, रीच सोया खाद्यतेल 500 एम. एल., संजय हळद पावडर 100 ग्रॅम, सुविधी कांदा लसूण मसाला 200 ग्रॅम, संजय मिरची पावडर 200 ग्रॅम, साखर दोन किलो, तांदूळ दोन किलो, तूर डाळ एक किलो, अशा उत्कृष्ट प्रतीच्या पॅकिंग असलेल्या किराणा वस्तूचे वाटप करताना शिवसेना उपजिल्हाप्रमुख व कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती मुन्ना उर्फ तुषार पाटील यांच्यासह शिक्षक सेना जिल्हा उपसंघटक भूषण नगरे , शिवसेना तालुकाप्रमुख रविद्र सोनवणे , शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले, शिवसेना उपतालुका प्रमुख शरद कोळी, शिवसेना माजी तालुकाध्यक्ष कडू पाटील ,शिवसेना उपशहरप्रमुख संतोष धोबी , शिवसेना शहर संघटक सुनील बारी, सारंग बेहेडे , कृष्णा पाटील ,अनिल पाटील, नाना पाटील ,धनराज पाटील, सुनील महाजन यांच्यासह यावल तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.