नेरी ;- अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ग्रामपंचायत नेरी बुद्रुक कार्यालय येथे साजरी करण्यात आली. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच कल्पना प्रकाश कुमावत, उपसरपंच निलेश खोडपे, ग्रामपंचायत सदस्य भगवान इंगळे राजश्री पाचपोळे,कल्पेश बेलदार,प्रभुदास ईधाटे,अरविंद खोडके, सुभाष वाघोडे,गौरव खोडपे, रविंद्र पाचपोळे ,अनिल धनगर, विवेक कुमावत, भागवत भिल, रविद्र भोई, सागर कुमावत, संजय शेळके, दत्ता ईधाटे आदी समाजबांधव उपस्थित होते.