यावल :;- तालुक्यातील दहिगाव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर आज सरपंच निवड करण्यात आली. सरपंचपदी काँग्रेसचे अजय अडकमोल तर उपसरपंचपदी किशोर मधुकर महाजन यांची बिनविरोध निवड करण्यात आली .
निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र इंगळे , त्यांचे सहाय्यक ग्रामसेवक व्ही एल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवडणुक प्रक्रीया पार पडली नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अनुसूचित जातीचे आरक्षण असल्याने व अनुसूचित जातीचा एकमेव उमेदवार निवडून आल्याने अजय अडकमोल हा २२ वर्षीय तरूण बिनविरोध सरपंचपदी विराजमान झाला आहे उपसरपंचपदि किशोर महाजन बिनविरोध निवडून आले
या विजयानंतर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोष केला
याप्रसंगी भाजपाचे विजयी झालेले चारही उमेदवार अनुपस्थित होते नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य काँग्रेस राष्ट्रवादीच्या पल्लवी महाजन, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सत्तार तडवी , रजनी बर्डे , आशाबाई चौधरी , वंदना चौधरी , मुमताजबी पठाण हे आठ सदस्य उपस्थित होते
राष्ट्रवादीचे गुलाब चौधरी , दिलीप चौधरी , ललित पाटील , अरुण पाटील , वजीर पठाण , वाय पठाण , किशोर अडकमोल , विजय बाविस्कर , कृष्णा पाटील , दिनकर फेगडे , उल्हास महाजन , करण महाजन , नरेंद्र महाजन यांचेसह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते