चुंचाळे ता.यावल;- नावरे ता.यावल येथे फैजपुर प्रांतधिकारी डाँ.अजित थोरबोले व यावल बिडीओ निलेश पाटील यांच्या आदेशावरूण व तालुका वैद्यकीय अधिकारी हेंमत बर्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली नावरे येथील साकळी पि.एस सी चे गटप्रर्वतक लीना पाटील व बचत गटातील महिलांनी मिळून नावरे येथील मराठी शाळेत स्वच्छता मोहिम राबवून विलगीकरण कक्षांची स्थापना केली . यावेळी गटप्रर्वतक लिना पाटील कोरोना या भयकर व्हाँयरसने जगात थैमान घातले आहे त्याच्या वर मात करायची असेल तर सर्वानीच लाँकडाऊनचे नियम पाळले पाहिजे संपुर्ण जग ही लढाई लढत आहे मात्र हि लढाई माझी किवा तुझी न करता प्रत्येकाने या लढाईत भाग घेऊन कोरोना ला हरवायच आहे गावात जनजागृती करत असतांना अनेक अडचणी येतात मात्र माझ्या सर्व सहकारी महिला जबाबदारीने कार्य पार पाडत आहे असे लिना पाटील यांनी सांगितले .
याबाबत सविस्तर कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाहेर गावावरुन येणाऱ्या प्रत्येकाला या शाळेतील विलगीकरण कक्ष तयार केला आहे यावेळी गटप्रर्वतक लिना पाटील,आशा वर्कर जयश्री पाटील,अंगणवाडी सेविका शोभा पाटील,मदतनिस जिजाबाई पाटील,सि.आर.पी.बचत गटाच्या ज्योती पाटील,धनाबाई पाटील,जि.प.शिक्षक सरवर तडवी,ग्रामपंचायत शिपाई रविद्र सावळे आदी उपस्थित होते.