जळगाव : भारत विकास परिषदेंतर्गत संपर्क फाउंडेशनतर्फे सध्याच्या “लॉकडाऊन’च्या काळात आवश्यक असलेला किराणा, औषधी पोचविण्याची घरपोच सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
यासाठी हेल्पलाईन क्र. 8432278624 या क्रमांकावर आपल्याला आवश्यक असलेली औषधी, किराणा हे सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत नोंद करावयाची आहे. आणि हे सर्व नोंद केलेले सामान दुसऱ्या दिवशी दुपारी 4 ते सायं. 7 या वेळेत आपणास घरपोच आणून देण्याची व्यवस्था करुन देण्यात आलेली आहे. औषधी व किराणा याची होणारी बिलाची रक्कम तेवढी फक्त द्यावयाची आहे, यासाठी कोणताही डिलेव्हरी खर्च अतिरिक्त लागणार नाही. संपर्क फाउंडेशनच्या माध्यमातून पुरुषोत्तम न्याती, प्रसन्न मांडे, तुषार तोतला, उज्ज्वल चौधरी, उमेश पाटील, चेतन दहाड, राजीव नारखेडे, रवींद्र लढ्ढा, चेतना नन्नवरे, डॉ. योगेश पाटील, धनंजय खडके, विशाल चोरडीया व प्रशांत महाजन ही प्रोफेशनल व उद्योजक मंडळी प्रत्यक्षात घरोघरी जाऊन घरपोच वस्तू पोहोचविण्याची सेवा देणार आहेत. तरी नागरिकांनी हेल्पलाईन क्रमांकावर नोंदणी करुन जास्तीत जास्त या सेवेचा लाभ घ्यावा. जेणेकरुन गर्दीत जाणे सहज टाळणे शक्य होईल.
गोर-गरिबांना नि:शुल्क जेवण
“लॉकडाऊन’च्या काळात अनेक गरिबांना रोजचे जेवण मिळणेही कठीण झाले आहे. अशा स्थितीत दररोज किमान 400 गोर-गरिब व मजूर व्यक्तींना नि:शुल्क जेवणाचे पाकीट हे संचारबंदी काळात वितरीत केले जाणार आहे.