जळगाव प्रतिनिधी ;- धूमस्टाईलने रस्त्यावरून पायी जाणार्या विद्यार्थ्याचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हिसकावून पळ काढल्याची घटना बुधवारी सायंकाळी येथे घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि , मानव छोटुलाल पाटील (वय-१८) रा. गुलमोहोर कॉलनी जळगाव हा विद्यार्थी असून बारावीचे शिक्षण घेत आहे. बुधवार १३ जानेवारी रोजी सायंकाळी ७ ते ८ वाजेच्या दरम्यान मु.जे.महाविद्यालयाच्या पाठीमागे गणपती मंदीराजवळ लहान भावासोबत पायी जात होते. त्यावेळी दुचाकीवर अज्ञात दोन जणांनी येवून मानव पाटील यांच्या भावात हातातील मोबाईल जबरदस्ती हिसकावून पळ काढला.दोन्ही भावंडांनी दुचाकीवर असलेल्या दोघांचा पाठलाग केला असता अज्ञात चोरटे दुचाकीवर पसार झाले. . याप्रकरणी मानव पाटील यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप परदेशी करीत आहे.








