भडगाव : – जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी डॉ.संजीव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष व जल संपदा मंत्री ना. जयंतराव पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. त्यांच्या निवडीचे महिला प्रदेश अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, माजी मंत्री एकनाथराव खडसे, जिल्हा अध्यक्ष रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ.सतीश पाटील, आ.अनिल पाटील, माजी आ. मनीष जैन, माजी आ. दिलीप वाघ, संजय गरुड, विलास पाटील, प्रमोद पाटील यांनी स्वागत केले. डॉ.संजीव पाटील हे जि.प.चे माजी उपाध्यक्ष असून जिल्हा दूध संघाचे संचालक आहेत. भविष्यात पक्ष संघटना मजबूत करू असे मत डॉ. संजीव पाटील यांनी मांडले.