जामनेर;- शुक्रवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास एका कंत्राटी वार्ड बॉयला मिळालेल्या शासकीय निवास्थानी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिकेचा चालक व त्या सोबत त्याची प्रेयसी हे या निवासस्थानी अश्लील चाळे करत असतानच रंगेहाथ पकडले गेले.
सविस्तर वृत्त असे की, जामनेर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात 108 या रुग्णवाहीकेवर चालक म्हणून काम करणाऱ्या व्यक्ती चे गेल्या दिवसापासून एका स्त्री सोबत प्रेमसंबंध होते व तो त्या स्त्री सोबत एका वार्ड बॉय च्या मिळालेल्या उपजिल्हा रुग्णालया च्या आवारातील शासकीय निवास्थानी अश्लील चाळे करत असे हा प्रकार शेजारी राहत असलेल्या सुज्ञ नागरिकांच्या लक्षात आला.त्यावर त्यांनी दि.4 रोजी शुक्रवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास या तिघांना अश्लील चाळे करत असताना रंगेहाथ पकडले.हा झालेला प्रकार उपजिल्हा रुग्णालय चे अधीक्षक यांच्या कानावर टाकला व त्या तिघांना पोलिसांच्या ताब्यात दिले.तसेच त्या वार्ड बॉय ला निलंबित केले. अधीक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार पत्र पाठवले.त्या तिघांवर जामनेर पोलीस स्टेशन ला भा. द. वि. कलम 112 व 117 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.झालेला प्रकार हा निंदनीय असून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई व्हावी असे मत तेथे उपस्थित सुज्ञ नागरिक व तसेच भा. ज.पा.पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी व्यक्त केले.