जामनेर तालुक्यातील पिंपळगांव खुर्द येथील घटना
पहूर, ता.जामनेर ;-सध्या शेतांमध्ये पेरणीपूर्व मशागतीचे कामे सुरु असून रोटाव्हेटरमध्ये एका ३५ वर्षीय तरुणाचा अडकूनजखमी झाल्याने त्याचा रुग्णालयात उपचार सुरु असतांना मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी जामनेर तालुक्यातील पिंपळगांव खुर्द येथे घडली. मुन्ना राजू भिलखेडे (वय-३५) असे मयत तरुणाचे नाव आहे.
मुन्ना राजू वानखेडे हा रोटाव्हेटर यंत्र चालवित असताना ठिबक सिंचनची नळी यंत्रात अडकली. ती नळी बाजूला करण्याच्या प्रयत्नात द्रॅक्टर चालक मुन्ना भिलखेडे खाली कोसळले आणि रोटाव्हेटर यंत्रात अडकले. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्यास तातडीने जळगाव येथे खासगी रुग्णालायात उपचारार्थ दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान आज सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.