भडगाव प्रतिनिधी;- तालुक्यातील अंजनविहिरी व आमडदे येथे चोरटयांनी धुमाकूळ घालत हजारो रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे दोन्ही गावांमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील अंजनविहीरे येथिल रहिवाशी संजय पाटील हे पत्नी अरुणाबाई व मुलगा योगेश सह स्वतःच्या शेतात कामासाठी गेले होते. घरी कोणीच नसल्याचा फायदा उचलत चोरट्यानी घरातील कपाटात ठेवलेले साडेतेरा ग्राम सोन्याची मंगलपोत, १० ग्रम नेकलेस, ७ ग्राम टोगल, ५ ग्रम काप, ५ ग्रम, ६ ग्रम व ३ ग्रम असे तीन अंगठ्या, ३ ग्रम पिंपळपान व १६ हजार रुपये रोख असा सर्व ऐवज चोरुन नेला. ही घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली. चोरट्यानी घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तोडुन घरात प्रवेश करत पुढील व मागिल घरात असलेले कपाटातुन दागदागिने शोधत साहित्य अस्ताव्यस्त फेकुन ऐवज लंपास केलेला दिसुन आला.

आमडदे येथे रहिवाशी अनिल साहेबराव पाटील हे वाहनचालक असून ते गाडी घेवुन बाहेर गावी गेले होता. त्याची पत्नी मनिषा अनिल पाटील या शेतात मजुरी साठी गेले असता घराचे कुलुप तोडुन कपाटात ठेवलेले १० ग्रम सोने व कापुस विकुन आलेले ७४ हजार रुपये रोख असा मुद्देमाल घेवुन चोरटे पसार झाले.
घटनेचा तपास करण्यासाठी जळगाव येथुन श्वान व ठसे तज्ञ यांना पाचारण करण्यात आले होते. अंजनविहीरे व आमडदे येथे दोन्ही ठिकाणी श्वानने घराच्या जवळपासच्या परीसरापर्यत माग दाखविला. रात्री उशिरा पर्यत घटनेबाबत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु होती. या दोन्ही घटनांचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर, पोलीस उप निरीक्षक अंनत पठारे, पोलीस नाईक लक्ष्मण पाटील, हवालदार भगवान बडगुजर, कॉन्स्टेबल ईश्वर पाटील करीत आहे







