टेंभुर्णी;- केंद्राने संपूर्ण केंद्रासाठी सुरु केलेला ऑनलाईन क्लास हा उपक्रम जिल्ह्यातील पहिला उपक्रम असून तो जालना जिल्ह्यासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य रामधन कळंबे यांनी सोमवारी केले.टेंभुर्णी ता जाफ्राबाद जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेने संपूर्ण केंद्रातील 11 शाळांसाठी ऑन लाईन क्लास हा उपक्रम सुरु केला असून या क्लासरुम च्या उदघाटन प्रसंगी उदघाटक म्हणून ते बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच गौतम म्हस्के होते तर गटशिक्षणाधिकारी डॉ सतिश सातव, विस्तार अधिकारी राम खराडे, मुख्याध्यापक आर डी लहाने, ग्रामविकास आधिकारी एस डी शेळके, संतोष पाचे, शाळा समिती अध्यक्ष विष्णू आढाव, धनराज देशमुख, जमींर शेख यांची प्रमुख उपस्तिथी होती.यावेळी श्री कळंबे पुढे म्हणाले कि लॉक डाऊन पासून सर्व शाळा बंद होत्या,जिल्हा परिषद च्या शिक्षकांनी ऑन लाईन आणि ऑफ लाईन पद्धतीने शिक्षण सुरु ठेवले होते.टेंभुर्णी केंद्राने संपूर्ण केंद्रासाठी आज सुरु केलेला हा उपक्रम तालुक्यासाठी मार्गदर्शक ठरणार असल्याचे सांगून त्यांनी तंत्रस्नेही आणि सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.टेंभुर्णी केंद्रीय शाळेसाठी या पूर्वी आपण जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आवारभिंत, 2 नवीन खोल्या, 2 खोल्यांची दुरुस्ती आदी कामे पूर्ण केली असून यापुढे हि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे ते म्हणाले. यावेळी डॉ सातव म्हणाले कि विदयार्थ्यांसाठी शाळा बंद असल्या तरी विदयार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये अशी तळमळ सर्व शिक्षकांची दिसून आली.आजच्या आधुनिक विज्ञान युगात उपलब्ध साधनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त दर्जेदार शिक्षण देण्यासाठी हा उपक्रम पूरक आहे.यावेळी गौतम म्हस्के यांनी अध्यक्षीय समारोप केला. जमीर शेख यांनी ही मनोगत व्यक्त .सुत्रसंचलन गणेश उगलमुगले यांनी केले.पंजाब दांदडे आणि पंजाब क्षीरसागर यांनी प्रात्यक्षिक सादर केले.यावेळी केंद्र समन्वयक नारायण पिंपळे, एकनाथ पंडीत, एम.के.वायाळ, रमेश शेळके, दिपक इंगळे, आनंदा माने, मंगला साने, मिरा पायघोन, छाया पुंगळे यांच्यासह केंद्रांतर्गत चे सर्व मुखाध्यापक, शिक्षक उपस्तिथ होते.