एरंडोल पोलिसांकडून झाली कारवाई
जळगाव ( प्रतिनिधी ) – एरंडोल येथील माजी उपनगराध्यक्ष दशरथ बुधा महाजन यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तीन संशयित आरोपींना अटक केली होती. हा अपघात नसून, पूर्वनियोजित हल्ला असल्याचे तपासात उघड झाले आहे.आता या घटनेतील चौथ्या संशयिताचे नाव समोर आले असून त्याला अटक करण्यात आली आहे.

तपासामुळे हा गुन्हा अपघात नसून घातपात असल्याचे समोर आले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी उमेश उर्फ बदक सुरेश सुतार (वय ४०), शुभम कैलास महाजन (वय १९) आणि पवन कैलास महाजन (वय २०, सर्व रा. एरंडोल) या तिन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपी उमेश उर्फ बदक सुरेश सुतार याने पूर्ववैमनस्यातून हा गुन्हा केल्याचे सांगितले. गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची बोलेरो चारचाकी गाडी संशयित आरोपी उमेश उर्फ बदक सुरेश सुतारकडून जप्त करण्यात आली आहे. सध्या अटक केलेल्या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस कसून(केसीएन)तपास करत आहेत.
या नवीन तपासात आता झिंग्या उर्फ शुभम दत्तात्रय पाटील (वय २८, रा. अमळनेर दरवाजा, एरंडोल) याला अटक केली आहे. एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक कॉन्स्टेबल योगेश महाजन व पो कॉ प्रशांत पाटील यांनी सदर आरोपीस ताब्यात घेऊन लोकल क्राइम ब्रांच (एलसीबी) जळगाव यांच्या पुढील तपासाकरिता ताब्यात देण्यात आले व सदर संशयिताला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सदर संशयिताला २ दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेली आहे. सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे हे करीत आहेत.