जामनेर तालुक्यातील कसबा पिंप्री येथील घटना
जामनेर ( प्रतिनिधी ) – येथून जवळच असलेल्या कसबा पिंप्री येथील २५ वर्षीय विवाहीत तरुणाचा घरात दारू पिऊन धिंगाणा घालतो म्हणून बापाने मुलाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी एलसीबी व फत्तेपूर पोलिसांनी तीन जणांना अटक केलेली आहे.
कसबा पिंप्री येथील शुभम धनराज सुरडकर (वय २५) याचा मृतदेह गांवापासून एक किमी अंतरावर शेख करीम शेख रऊफ यांच्या शेताच्या बांधावर रस्त्याच्या कडेला आढळून आला. सकाळी रनिंग करणेसाठी गेलेल्या तरुणाना हा मृतदेह दिसला. त्यांनी ही माहिती पोलीस पाटील समद तडवी यांना दिली. त्यांनी पोलीसाना घटनेची माहिती दिली.(केसीएन)फत्तेपूर पोलीस स्टेशनचे सहा.पो.नि. अंकुश जाधव यांनी सहकाऱ्यासह घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाची पाहणी केली असता मृताच्या डोक्यावर कठीण शस्त्राने मारल्याचे व मृतदेह अज्ञातानी या ठिकाणी आणून टाकलेला असल्याचे प्रथम दर्शनी लक्षात आले.
एलसीबीने घटनास्थळी येऊन तपासाला सुरुवात केली. यानंतर मयत शुभम याच्या घरी गेले असता तेथे अंथरलेली चटई पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी उचलली. तेव्हा जमिनीवर रक्ताचे डाग दिसून आले.(केसीएन)शुभमच्या वडिलांना विश्वासात घेतले असता त्यांनी खुनाची कबुली दिली. शुभम यास दारूचे व्यसन असल्यामुळे तो आई-वडील, भाऊ-बहीण, पत्नी यांना वारंवार त्रास देऊन वाद निर्माण करीत असे. त्यांच्या त्रासाला सर्वच कुटुबीय कंटाळले होते. पत्नी देखील घर सोडून निघून गेली होती. रात्री दि. २१ जून रोजीही घरात वाद करून हाताने काच फोडला होता. शुभम घरात झोपलेला असतांना त्यांचे वडील धनराज सुपडु सुरडकर (वय-४५) यांनी रागाच्या भरात मोठा दगड शुभमच्या डोक्यात टाकला. त्यानंतर त्याचा मृतदेह धनराज यांनी हलवण्यासाठी मुलगा गौरव धनराज सुरडकर आणि त्यांचा भाऊ हिरालाल सुपडू सुरडकर यांना बोलावून घेतले.
यानंतर शुभमचा मृतदेह त्यांच्याच चारचाकी वाहनात टाकून जवळच्या पिंपळगाव चौखांबे या गावाच्या रस्त्यावर टाकून संशयित आरोपी घरी परत आले. दरम्यान या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.(केसीएन) फत्तेपुर पोलीस स्टेशनचे ताब्यात संशयित आरोपींना देण्यात आले आहे. सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगांव परिमंडळ कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधीकारी पाचोरा उपविभाग धनंजय येरुळे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा संदिप पाटील, फत्तेपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अंकुश जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पोहेकों/विनोद पाटील, पोहेकों/लक्ष्मण पाटील, पोना/राहुल पाटील, पोना हेमंत पाटील, पोकों/जितेंद्र पाटील, पोकों/ईश्वर पाटील, पोकों/राहुल महाजन, पोकों/भुषण पाटील, चापोहेको भरत पाटील, दर्शन ढाकणे तसेच फत्तेपुर पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार यांनी केली असुन पुढील तपास फत्तेपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक अंकुश जाधव हे करीत आहेत.