जळगाव जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
जळगाव (प्रतिनिधी) : जिल्हयांतील रामानंदनगर पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हेगार अशोक कोळी याचे विरुध्द दारुबंदी कायदयाअंतर्गत ९ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याच्याविरुद्ध एमपीडीए प्रस्ताव रामानंदनगर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे यांनी तयार करुन प्रस्ताव हाएलसीबी, जळगाव येथे सादर केला होता. प्रस्तावाचे अवलोकन केल्यानंतर जिल्हाधिकार, जळगाव यांचे कडेस सादर करण्यात आला होता. त्यानुसार दि.३० रोजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी स्थानबध्द आदेश पारीत केला आहे.
अशोक बाळू कोळी (वय ३६ रा.साईबाबा मंदिर जवळ, समतानगर, जळगाव) याच्यावर दारूबंदी कायद्यानुसार गुन्हे आहेत. संपूर्ण कामगिरी रामानंदनगर पो.स्टे.चे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, सहा.पो.निरी. विठ्ठल पाटील, पोहेकों संजय सपकाळे, जितेंद्र राजपूत, सुशिल चौधरी, इरफान मलीक, रेवानंद साळुखे, हेमंत कळसकर, विनोद सुर्यवंशी, रविंद्र चौधरी, उमेश पवार अशांनी केली. अशोक कोळी याला मध्यवर्ती कारागृह, मुंबई जि.मुंबई येथे दाखल करण्यात आले आहे.
एम.पी.डी.ए.प्रस्ताव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेडी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल नंदवालकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पो.निरी.किसन नजनपाटील व त्यांचे अधिनस्त सहाय्यक फौजदार युनूस शेख इब्राहिम, हवालदार सुनिल पंडीत दामोदरे, जयंत भानुदास चौधरी, रफिक शेख कालु, ईश्वर पंडीत पाटील अशांनी काम पाहिले आहे.