जळगाव शहरातील महाबळ कॉलनी रस्त्यावरील घटना
जळगाव (प्रतिनिधी) :- दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून तरूणाला दोन जणांनी शिवीगाळ करत चॉपर काढून वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी रामानंद नगर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रविण विजय नाईक (वय १९, रा. समता नगर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. सोमवारी दि. १४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता प्रविण हा महाबळ येथून पायी जात असतांना संशयित आरोपी सरोज तडवी आणि विक्की कोळी (दोघ रा. समता नगर) यांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यावेळी प्रविण नाईक याने पैसे देण्यास नकार दिला. या रागातून दोघांनी शिवीगाळ करत मारहाण केली तर विक्की कोळी याने कंबरेतील चॉपर काढून प्रविण नाईक याच्यावर वार करून जखमी केले.
जखमी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी प्रविण नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सरोज तडवी आणि विक्की कोळी दोन्ही रा. समता नगर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस नाईक ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहे.