जळगाव शहरात मेहरूण परिसरात घटना
जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील मेहरूण भागातील अदित्य चौकात २८ वर्षीय महिला दारू पिऊन रस्त्यावरील येणाऱ्या जाणाऱ्या नागरीकांना त्रास होईल असे मोठमोठ्याने आरडा ओरड करून गैरवर्तन केल्याचा प्रकार रविवारी ७ डिसेंबर रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास समोर आला आहे. याप्रकरणी पोलीसांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी ८ डिसेंबर रोजी मध्यरात्री १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील मेहरूण परिसरातील आदित्य चौकात रविवारी ७ डिसेंबर रोजी रात्री सव्वा नऊ वाजेच्या सुमारास एक २८ वर्षीय महिला ही दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणाहून येणाऱ्या व जाणाऱ्या लोकांना त्रास होईल असे मोठ मोठ्याने आरडा ओरड करून गैरवर्तन केले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर काही नागरीकांनी पोलीसांशी संपर्क साधून याची माहिती दिली. त्यानुसार पोलीसांनी कारवाई केली. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात सदर महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक पंकज पाटील हे करीत आहे.









